Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

याला म्हणतात आगीतून फुफाट्यात! विकेट वाचवण्यासाठी मुशफिकुर रहीमने असं काही केलं की...; पाहा Video

Bangladesh vs New Zealand : न्यूझीलंड आणि बांगलादेश सामन्यातील मुशफिकुर रहीमची (Mushfiqur Rahim) विकेट खूपच मनोरंजक होती, खरं तर फलंदाजानेच स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय. 

याला म्हणतात आगीतून फुफाट्यात! विकेट वाचवण्यासाठी मुशफिकुर रहीमने असं काही केलं की...; पाहा Video

Mushfiqur Rahim Viral Video : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या (Bangladesh vs New Zealand) मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळवला गेला. या सामन्यात बांगलादेशचा संपूर्ण संघ 34.3 ओव्हरमध्ये अवघ्या 171 धावांत ऑलआऊट झाला. नझमुल हुसेन शांतो इतर कोणत्याही खेळाडूंना मैदानाचत पाय टिकवता आला नाही. तर महमुदुल्लाहने 21 धावा केल्या आणि तो बांगलादेशसाठी दुसरा सर्वोत्तम धावा करणारा खेळाडू ठरला. नझमुल हुसेन शांतो याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने चार, तर कर्णधार लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) एक विकेट घेतली. मात्र, या सामन्यातील एक घटना सर्वांनाच लक्षात राहिली.

सामन्यातील एक विकेट खूपच मनोरंजक होती, खरं तर फलंदाजानेच स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय. बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम 18 धावा करून बाद झाला. विकेट वाचवायला गेलेल्या मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahman) असं काही केलं की, त्याला फटका त्याला सहन करावा लागला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

पाहा Video

तर झालं असं की, बांगलादेशने 35 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर शांतो आणि मुशफिकूर यांनी मिळून डावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कॅप्टन फर्ग्युसनने गोलंदाजीची कमान सांभाळली. फर्ग्युसनचा चेंडू रोखण्यासाठी मुशफिकुरने पायाचा वापर केला आणि त्याचा पाय स्टंपवर आदळला. दोघांनी मिळून डाव काही प्रमाणात सांभाळला पण नंतर मुशफिकुरचा मूर्खपणा बांगलादेशला चांगलाच महागात पडला. बांगलादेशने 88 धावांवर चौथी विकेट गमावली अन् सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला. ट्रेंट बोल्ट आणि कोल मॅककॉन्ची यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

आणखी वाचा - एक चुकीचा निर्णय अन् खेळ खल्लास! रोहितच्या डोक्यात चाललंय काय? आश्विनबद्दल म्हणतो...

दरम्यान,  बांगलादेश दौऱ्यासाठी न्यूझीलंडने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. विशेष म्हणजे संघाची कमान नव्या कर्णधाराकडे देण्यात आली होती. लॉकी फर्ग्युसनला संघाची कमान दिली अन् केन विल्यमसनला आराम दिला होता. आता विल्यमसनला वर्ल्ड कपसाठी तयार असून तो फीट असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Read More