Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताच्या डगआउटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत दिसली ‘मिस्ट्री गर्ल’! बुमराहकडे प्रेमाने बघणारी ती आहे तरी कोण?

Who is Mystery Girl: भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अ‍ॅक्शन आणि न विसरता येणार अशा क्षणांचा पूर्ण डोस मिळाला आहे. पण यामध्ये एका अनपेक्षित क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.   

भारताच्या डगआउटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत दिसली ‘मिस्ट्री गर्ल’! बुमराहकडे प्रेमाने बघणारी ती आहे तरी कोण?

Mystery Girl spotted with Jasprit Bumrah: शुभमन गिलच्या जबरदस्त 269 धावांपासून ते मोहम्मद सिराजच्या धमाकेदार सहा विकेट्स आणि हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांच्यातील 303 धावांच्या भागीदारीपर्यंत, भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सध्या सुरू असलेला दुसरा कसोटी सामना चाहत्यांसाठी पूर्णपणे ब्लॉकबस्टर ठरला आहे. याशिवाय या कसोटी मालिकेतील दुसऱ्या टेस्टमध्ये मैदानावर अनेक थरारक क्षण घडले. पण या सगळ्याच्या दरम्यान एक दृश्य असं घडलं की चाहत्यांचे लक्ष चक्क स्टेडियममधील डगआऊटकडे वळलं. विशेष म्हणजे यात लक्ष वेधलं भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याच्या शेजारी बसलेल्या ‘मिस्ट्री गर्ल’ने. कोण आहे ही मुलगी  चला जाणून घेऊयात. 

डगआऊटमध्ये कोण होती ती मुलगी?

इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या 26व्या ओव्हरदरम्यान कॅमेऱ्यात एक दृश्य कैद झालं. या दृश्यामध्ये टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये बुमराहसोबत एक महिला दिसली, ती बुमराहकडे पाहून हसताना दिसत होती. क्षणार्धात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि “ही कोण आहे?” यावरून चर्चांना उधाण आलं.

'मिस्ट्री गर्ल' चा संघाशी संबंध काय? 

आखेर शोधाशोध करून हे उघड झालं की त्या मुलीचे नाव हे यास्मिन बडियानी असे आहे. जी इंग्लंड अ‍ॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डात (ECB) ऑपरेशन्स टीममध्ये कार्यरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती भारतीय संघाच्या ट्रेनिंग जर्सीत दिसली, ज्यामुळे अनेकांना ती टीम इंडियाशी संबंधित आहे की काय? असा प्रश्न पडला.

यास्मिनचं काम काय आहे?

इंग्लंड अ‍ॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून अधिकृतपणे यास्मिन बडियानीला भारताच्या दौऱ्यादरम्यान भारतीय संघाच्या व्यवस्थापनास मदत करण्यासाठी नेमण्यात आलं आहे. लॉजिस्टिक मॅनेजमेंट, शेड्युल कोऑर्डिनेशन आणि ECB आणि भारतीय संघ यांच्यातील संवाद सुलभ ठेवणे अशी तिची जबाबदारी आहे. 

 

प्रोफेशनल प्रवासावर एक नजर

यास्मिनने 2010 साली युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टरमधून फिजिओथेरपीमध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर Harrogate and District NHS Foundation Trust मध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम सुरू केलं. पुढे तिने Leicester City Football Club मध्ये 2010 ते 2013 दरम्यान स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर यास्मिनने Phizz Ltd आणि ORS Sport या प्रसिद्ध स्पोर्ट्स हायड्रेशन ब्रँड्ससाठी ‘हेड ऑफ स्पोर्ट’ म्हणून काम केलं. खेळाडूंच्या परफॉर्मन्स आणि रीकव्हरीशी संबंधित कामांमध्ये तिचा मोठा अनुभव आहे.

 

हा अनुभव घेऊनच तिने ECB मध्ये प्रवेश केला, जिथे ती सध्या क्रिकेट संघांच्या ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळते.

बुमराह मैदानात नव्हता, तरी आहे चर्चेत

या कसोटीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून तो खेळाचा भाग नव्हता. मात्र त्याच्या शेजारी बसलेल्या यास्मिनमुळे तो चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

Read More