Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs AUS : क्रिकेट मॅच बघण्यासाठी पठ्ठ्यांन चक्क विकल्या बकऱ्या; म्हणाला, "असा हिरमोड कधीच झाला नाही"

रोहित शर्माच्या खेळीच्या जोरावर भारताने शुक्रवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला

 IND vs AUS : क्रिकेट मॅच बघण्यासाठी पठ्ठ्यांन चक्क विकल्या बकऱ्या; म्हणाला,

IND vs AUS : कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) (नाबाद 46) खेळीच्या जोरावर भारताने शुक्रवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला (IND vs AUS). ऑस्ट्रेलियाने भारतासमोर आठ षटकांत 91 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे रोहितच्या संघाने 7.2 षटकांत पूर्ण केले. केएल राहुल (kl rahul) (10), विराट कोहली (virat kohli) (10), सूर्यकुमार यादव (शून्य) (suryakumar yadav) आणि हार्दिक पांड्या  (hardik pandya)(09) मोठे योगदान देऊ शकले नाहीत, तेव्हा रोहितने 20 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह 46 धावा करत कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

मात्र पावसामुळे हा सामना सुरु होण्यास उशीर झाला. नागपूरच्या (nagpur) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पोहोचलेल्या सुमारे 40 हजार प्रेक्षक आणि करोडो चाहत्यांचे सामना (match) कधी सुरु होणार याकडेच लक्ष होते. शगेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे (Rain) मैदान ओले झाले होते. अशा परिस्थितीत सामना खेळवण्यासाठी खेळपट्टी तयार करण्यात येत होती. त्यामुळे सामना सुरु होण्यासाठी वेळ लागला.

मॅचसाठी उशीर झाल्याने एका चाहत्याचा जरा जास्तच हिरमोड झाला. हा सामना पाहण्यासाठी या चाहत्याने चक्क आपल्या दोन बकऱ्या विकल्या आणि सामन्याची तिकीटे खरेदी केली. या चाहत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोणतीही मॅच पाहण्यासाठी येणार नाही

"हा सामन्या पाहण्यासाठी मी माहूरवरुन आलो आहे. पण माझा खूप हिरमोड झाला आहे. माझ्या दोन बकऱ्या साडेआठ हजारांना
 विकून मी पाच हजारांचे तिकीट काढले. तीन ते चार हजार इथे खर्च झाले आणि तीन किलोमीटर पायी आलो. त्यामुळे असा हिरमोड कधीच झाला नाही. आता मी कोणतीही मॅच पाहण्यासाठी येणार नाही. मी घरी टिव्हीवर फुकटात पाहीन," असे हा चाहता म्हणताना दिसत आहे.

दरम्यान, अखेरच्या षटकात भारताला नऊ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने षटकारानंतर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयासह भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T2OI जिंकण्याच्या पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली.

Read More