IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये दररोज प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. याचवेळी टीव्हीवर सामन्याची लाईव्ह कॉमेंट्री ऐकून सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन होत असतं. भारताचे माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांचा कॉमेंट्री बॉक्समध्ये शायराना अंदाज सुद्धा प्रेक्षक एन्जॉय करतात. तर अनेकदा खेळाडू आणि सोबत असलेल्या कॉमेंटेटरची टेर सुद्धा खेचताना दिसतात. असंच काहीसे पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS VS CSK) सामन्या दरम्यान घडलं. यावेळी अंबाती रायडूला (Ambati Rayudu) नवजोत सिंह सिद्धूशी वाद घालणं भारी पडलं. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
चंदीगड स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करून 219 धावा केल्या तर चेन्नईला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले. पण हे आव्हान चेन्नई सुपरकिंग्स पूर्ण करू शकली नाही आणि त्यांचा 18 धावांनी पराभव झाला. या सामन्यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये
नवजोत सिंह सिद्धू आणि माजी क्रिकेटर अंबाती रायडू उपस्थित होते. यावेळी अंबाती रायडू सिद्धूला म्हणाला की, 'पाजी तुम्ही तुमची आवडती टीम अशी बदलता जसे सरडा रंग बदलतो'. यावर सिद्धू थोडीच गप्प बसणार होते. त्यांनी रायडूवर पलटवार केला आणि म्हटले की, जर गिरगिट कोणाचं आराध्यदैवत म्हणजेच ईष्ट देवता असेल तर तो तू आहेस' यावर दोघेही जोर जोरात हसू लागले.
हेही वाचा : 'आम्ही सर्व तुझ्यासाठीच...' RJ महवशने युझवेंद्र चहलसाठी केली खास पोस्ट, युझीच्या कमेंटने वेधलं लक्ष
कॉमेंट्री बॉक्समध्ये हसत हसत नवजोत सिंह सिद्धूने अंबाती रायडूला त्याच्या निवृत्तीचा निर्णय परत घेतल्याची आठवण करून दिली. जेव्हा अंबाती रायुडूला 2019 मध्ये वनडे वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नाही, तेव्हा त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती आणि काही काळानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले होते. यावरून सिद्धूने अंबातीला हसत हसत टोला लगावला.
Siddhu owned both rayadu and dhoni pic.twitter.com/JLsf8iOOrZ
Tezas (Tezas_14) April 8, 2025
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. प्रियांश आर्यने पंजाबसाठी मोठी खेळी करत शतक ठोकले आणि धावसंख्या 200 पार पोहोचवली. पण सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 201 धावाच केल्या. त्यामुळे पंजाबने 18 धावांनी हा सामना जिंकला.