Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Neeraj Chopra मुळे पुन्हा एकदा भारतीयांची कॉलर टाइट! 90 मीटरचा टप्पा ओलांडला; पाहा Video

Neeraj Chopra Makes History Watch Video: नीरजने यापूर्वी अनेकदा प्रयत्न करुनही त्याला 90 मीटरचा टप्पा गाठता येत नव्हता. मात्र यंदा त्याला यामध्ये यश आलं.

Neeraj Chopra मुळे पुन्हा एकदा भारतीयांची कॉलर टाइट! 90 मीटरचा टप्पा ओलांडला; पाहा Video

Neeraj Chopra Doha Diamond League Throw Video: भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग 2025 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने प्रथमच अंतरराष्ट्रीय स्तरावरील भालाफेक स्पर्धेमध्ये 90 मीटरचा टप्पा गाठण्यात यश मिळवलं आहे. शुक्रवारी दोहा इथे आयोजित स्पर्धेत नीरजने नव्वदी मीटरपेक्षा अधिक दूर भाला फेकत वैयक्तिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला. अनेकदा प्रयत्न करुनही नीरजला 90 मीटरपेक्षा दूर भाला फेकण्यात सातत्याने अपयश येत होतं. मात्र दोहा येथे नीरजने 90 मीटरपेक्षा अधिक दूर भाला फेकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 

मानाच्या यादीत मिळवलं स्थान

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत 90 मीटरहून अधिक लांब भाला फेकणाऱ्या खेळाडूंच्या मानाच्या यादीत स्थान मिळवलं आहे.  नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये 90 मी. पेक्षा लांब भाला फेकत त्याच्या अंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील सर्वाेत्कृष्ट कामगिरी केली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकला. यासह 90 मीटरपेक्षा अधिक दूर भाला फेकत वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या जगातील अव्वल 25 भालाफेकपटूंमध्ये नीरजचा समावेश झाला आहे. 

यापूर्वीचा बेस्ट परफॉरमन्स कोणता?

डायमंड लीगमधील पहिल्या थ्रोपासून नीरज लय गवसली असून तो या स्पर्धेत काहीतरी वेगळं करणार याची चाहूल लागली होती. त्याने पहिल्याच प्रयत्नात 88.44 मीटरचा टप्पा गाठला. मात्र त्याचा दुसरा थ्रो फाऊल ठरला. पण तिसऱ्या प्रयत्नात त्याने 90 मीटरचा टप्पा ओलांडण्याचा भीमपराक्रम केला. अंतरराष्ट्रीय स्तरावर नीरजचा यापूर्वी बेस्ट सर्वात दूरवरील थ्रो हा 89.94 मीटर इतका होता.

सर्वात दूर भाला कोणी आणि केव्हा फेकलाय?

पुरुषांच्या भालाफेकीत नीरज आता जागतिक आघाडीच्या खेळाडूंमध्ये 23 व्या स्थानावर आहे. जर्मनीचा प्रसिद्ध भालाफेकपटू मॅक्स डेहनिंग 90.20 अंतरासहीत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केहरॉन वॉलकॉट 90.16 अंतरासहीत 90 मीटरहून अधिक दूर भालाफेक करणाऱ्या अधिक मीटरच्या यादीत चोप्राच्या मागे आहेत. चेक प्रजासत्ताकचे चोप्राचे प्रशिक्षक जान झेलेन्झनी यांनी 1996 मध्ये 98.48 मीटरच्या विश्वविक्रमासह जागतिक विक्रमवीरांच्या यादीत आघाडीवर आहेत.

थोडक्यात हुकलं पहिलं स्थान

नीरज चोप्रा 90.23 मीटरच्या भालाफेकनंतर डायमंड लीग स्पर्धा जिंकणाऱ्या दावेदारांच्या यादीत आघाडीवर होता. पण आपल्या अखेरच्या प्रयत्नात चॅम्पियन खेळाडू ज्युलियन वेबरने तब्बल 91 मीटर दूर भालाफेक करत नीरज चोप्रावर कुरघोडी करत पहिलं स्थान पटकावलं. नीरजला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. वेबर हा यंदाच्या डायमंड लीग स्पर्धेचा विजेता ठरला. 

25 मीटर दूर भाला फेकणारे कोणत्या देशाचे सर्वाधिक खेळाडू?

जगात 90 मीटरपेक्षा लांब भालाफेक करणाऱ्या 25 भालाफेकपटूंपैकी जर्मनीचे सहा, फिनलँडचे चार, चेक प्रजासत्ताकचे दोन, ग्रेनाडा, पाकिस्तान, केनिया, रशिया, ग्रीस, नॉर्वे, ग्रेट ब्रिटन, चायनीज ताइपेई, अमेरिका, लाटविया, एस्टोनिया आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रत्येकी एक-एक भालाफेकपटू आहेत. या यादीत नीरज चोप्रा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. भारतातील एकमेव आहे.

Read More