भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्ण कामगिरी केली असून, World Athletics Championships मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. यानंतर नीरज चोप्रा आता भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक झाला असून, त्याच्यावर भारतीयांकडून कौतुकासह प्रेमाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राने 88.17 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. यावेळी पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमला (Arshad Nadeem) रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. सामन्यानंतर नीरज चोप्राने आपल्या मनात अर्शद नदीमबद्दल फक्त आदर असल्याचं दाखवून दिलं. त्याने त्याच्यासह फोटोशूटही केलं. एकीकडे नीरज चोप्राच्या या कृतीचं कौतुक केलं जात असताना दुसरीकडे त्याच्या आईने पाकिस्तानी खेळाडूचा पराभव केल्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सर्वांचं मन जिंकलं आहे.
नीरज चोप्राच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या आई-वडिलांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने नीरज चोप्राची आई सरोज देवी यांना तुमच्या मुलाने पाकिस्तानी खेळाडूला पराभूत केल्याचं पाहून कसं वाटत आहे? असं विचारलं. त्यावर सरोज देवी यांनी उत्तर देताना खेळाडू कोणत्या देशाचा आहे याच्याने फरक पडत नाही असं उत्तर देत सर्वांना भारावून टाकलं.
फक्त पदकच नाही, तर मनही सोन्याचं! विजयानंतर नीरज चोप्राचं 'ते' कृत्य पाहून पाकिस्तानही भारावला
त्यांनी सांगितलं की, "हे पाहा, सर्वजण मैदानावर खेळण्यासाठी आले आहेत. त्यातील एकाचाच विजय होणार आहे. त्यामुळे तो खेळाडू पाकिस्तानचा आहे की हरियाणाचा यामुळे फरक पडत नाही. हा फक्त आनंदाचा प्रश्न आहे. जरी पाकिस्तानी खेळाडू जिंकला असता तरी आम्हाला तितकाच आनंद झाला असता".
A reporter asked #NeerajChopra 's mother about how she feels about Neeraj defeating a Pakistani athlete to win gold.
— Roshan Rai (@RoshanKrRaii) August 28, 2023
His mother said : A player is a player, it doesn't matter where he comes from, I am glad that the Pakistani player ( Arshad Nadeem) won as well.
This whole… pic.twitter.com/imk3ZHyLrC
नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, भारत आणि पाकिस्तान भालाफेक स्पर्धेत चांगली कामगिरी करत असल्याचा आनंद असल्याचं म्हटलं होतं. गेली कित्येक वर्षं युरोपियन देशांनी या खेळात वर्चस्व गाजवलं आहे. "अर्शदने चांगली कामगिरी केली याचा आनंद आहे. आम्ही दोघांनीही कशाप्रकारे दोन्ही देश प्रगती करत आहेत यावर चर्चा केली याआधी युरोपियन खेळाडू असायचे, पण आता आम्ही तिथे पोहोचलो आहोत," असं नीरज चोप्राने म्हटलं.