Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आरारा खतरनाक! पाहा नीरज चोप्राच्या अभिनयाची जबरदस्त झलक

व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल? 

आरारा खतरनाक! पाहा नीरज चोप्राच्या अभिनयाची जबरदस्त झलक

मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भालाफेक विभागात सुवर्णपदकाची कमाई करत जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावणाऱ्या नीरज चोप्रा याच्या नावाचीच हवा मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. पंतप्रधानांची भेट घेण्यापासून ते अगदी केबीसीच्या मंचावर बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारण्यापर्यंतचा पल्ला नीरजनं गाठला आहे. यादरम्यानच नीरजच्या नावाची दहशत आता अभिनय वर्तुळात पाहायला मिळत आहे. 

नीरजच्या रुपानं याआधीच अनेक तरुणींना घायाळ केलं होतं. आता त्याच्या अभिनयाची जादू या लोकप्रियतेत भर टाकत आहे. एका जाहिरातीच्या निमित्तानं नीरजचं हे रुप सर्वांसमोर आलं आहे. जाहिरातीच्या निमित्तानं त्याच्यात दडलेला कलाकार बाहेर आला आहे. 

'क्रेड'च्या एका जाहिरातीत तो पाच वेगवेगळ्या रुपांमध्ये दिसत आहे. 360 डिग्री मार्केटिंग... असं लिहित त्यानं हा जाहिरातीचा व्हिडीओ  शेअर केला. पाहता पाहता त्याच्या या व्हिडीओला असंख्य व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले. 

अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत नीरज एक अभिनेता म्हणूनही किती सक्षम आहे यावर शिोक्कामोर्तब केलं. ज्यानंतर काही मीम्सही व्हायरल झाले. अनेक स्टारकिड्स आणि सेलिब्रिटींना विशेष म्हणजे सध्याच्या अभिनेत्यांना नीरजची भीती वाटत असावी, असं काही नेटकरी म्हणाले. तर, सर्वच क्षेत्रांत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नीरजला काही नेटकऱ्यांना अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. 

Read More