Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

युवराजच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन....

क्रिकेटर युवराज सिंगच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

युवराजच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन....

नवी दिल्ली : क्रिकेटर युवराज सिंगच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

कोण आहे तो?

त्या पाहुण्यासोबतचा एक खास फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा पाहुणा म्हणजे छोटासा कुत्रा आहे. ब्राऊनिश रंगाच्या या कुत्र्याला युवीनं कोको असं नाव दिलं आहे. त्याच्या रंगावरूनच युवीनं त्याला शोभेल असं नाव दिलं असावं.

युवी म्हणतो...

या कोकोचा फोटो शेअर करत युवीने लिहिले की, "आमच्या कुटुंबातील सर्वात लहान आणि गोंडस सदस्य. युवीकडे अजून एक कुत्रा आहे." त्याच्यासोबतचे फोटोज तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. फक्त युवीचं नाही तर विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी या क्रिकेटर्संच्या श्वानप्रेमाची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळते. 

fallbacks

Read More