Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Shocking: आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूने जाहीर केली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती! वर्ल्ड कपनंतर संपणार कारकिर्द

Cricketer retire from ODI: आजकाल जागतिक क्रिकेटमध्ये निवृत्ती घेण्यासाठी खेळाडूंमध्ये स्पर्धा सुरू आहे. स्टीव्ह स्मिथ, रोहित शर्मा, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, हेनरिक क्लासेन, मार्कस स्टोइनिस, मुशफिकुर रहीम आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.  

Shocking: आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूने जाहीर केली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती! वर्ल्ड कपनंतर संपणार कारकिर्द

Sophie Devine to retire from ODI cricket after World Cup: सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संन्यास घेणाऱ्या खेळाडूंची लाटच आली आहे. स्टीव्ह स्मिथ, रोहित शर्मा, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, हेनरिच क्लासेन, मार्कस स्टॉइनिस, मुशफिकूर रहीम आणि एंजेलो मॅथ्यूज यांसारख्या दिग्गजांनी विविध फॉर्मेटमधून अचानक निवृत्ती घेत क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला. आता या यादीत आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे.

न्यूझीलंडच्या वनडे कर्णधाराचा मोठा निर्णय (New Zealand Cricket)

न्यूझीलंड महिला संघाच्या अनुभवी कर्णधार सोफी डिवाइनने आयसीसी 2025 (ICC 2025 ) महिला वनडे वर्ल्ड कपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. सोफी  35 वर्षीय सोफीने आतापर्यंत 298 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 2020 पासून ती संघाच्या कायमस्वरूपी कर्णधार आहेत. तिच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने महिला क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली.  

हे ही वाचा: TNPL मध्ये वादळ! आर. अश्विनच्या संघावर चेंडू छेडछाडीचा गंभीर आरोप, तक्रार दाखल

 

टी20 वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक यश

डिवाइनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने 2022 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये ब्राँझ मेडल जिंकले आणि 2024 मध्ये पहिल्यांदाच ICC महिला टी20 विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. महिला क्रिकेटमधील एक प्रभावी ऑलराउंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोफीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7421 धावा आणि 226 विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या खात्यात 8 वनडे शतकं आणि 1 टी20 शतक नोंदवलेलं आहे.

हे ही वाचा: W, W, W, W, W...ऋषभ पंतच्या टीममेटची जबरदस्त कामगिरी! 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट्स, सोशल मीडियावर धुमाकूळ

काय म्हणाली सोफी?

निवृत्तीच्या निर्णयाबद्दल बोलताना सोफी म्हणाली, "माझ्यासाठी वनडे क्रिकेटमधून मागे पाऊल घेण्याचा आता योग्य वेळ आहे असं वाटतंय. न्यूझीलंड क्रिकेटच्या पाठिंब्यामुळे मी एक अशी भूमिका घेऊ शकते जिथून मी संघाला अजूनही काही देऊ शकते. माझं संपूर्ण लक्ष आणि समर्पण या टीमला यशस्वी करण्यासाठी आहे. माझी भूमिका पुढील 6 ते 9 महिन्यांत महत्त्वाची असणार आहे आणि मला त्याची खूपच उत्सुकता आहे."

हे ही वाचा: टीम इंडियाचा क्रिकेटपटू , लग्नानंतर 6 वर्षांनी झाला बाबा, पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म

डिवाइनचा संन्यास हे न्यूझीलंडसाठी एक युग संपण्यासारखं आहे. पण त्यांनी घडवून आणलेली यशोगाथा आणि संघासाठी दिलेला योगदान त्यांच्या नावाला कायम आदराने लक्षात ठेवणारं ठरेल.

Read More