Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

"रोहित शर्माला कर्णधार करा..." शिर्डी साई बाबा मंदिरात पोहोचलेल्या नीता अंबानींना MI च्या चाहत्यांनी केली मोठी मागणी, Video

Nita Ambani Visits Shirdi Sai Baba Temple: नीता अंबानी अलीकडेच शिर्डीला साईबाबांच्या दरबारात पोहचली. त्यावेळी रोहित शर्माला कर्णधार करा अशी मागणी एका चाहत्यांनी केली. याचा Video Viral झाला आहे.   

Nita Ambani encountered a fervent supporter of Rohit Sharma: आयपीएलच्या 18 व्या हंगामातही मुंबई इंडियन्स अजूनही लयीत नाहीयेत. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी जिंकावणाऱ्या रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले होते. हार्दिक या वर्षीही कर्णधार आहे. पण, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली नाही. दरम्यान, मुंबई इंडियन्सची मालक असलेले अंबानी कुटुंब आजकाल भक्तीत मग्न आहे. अलिकडेच, अनंत अंबानी यांनी त्यांची 170 किमी लांबीची पदयात्रा पूर्ण केली आणि द्वारकाधीश येथे प्रार्थना करत दर्शन घेतलं. आता नीता अंबानी देखील शिर्डीला पोहोचल्या, जिथे त्यांनी साईबाबांच्या दरबारात त्यांनी दर्शन घेतले.  नीता अंबानी दरवर्षीप्रमाणे शिर्डीला साई दर्शनासाठी गेल्या तेव्हा तिथल्या एका चाहत्याने रोहित शर्माला कर्णधार बनवण्याची मागणी केली. यावर नीता अंबानी यांनी एक उत्तम उत्तर दिले. 

काय म्हणाल्या नीता अंबानी? 

देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाच्या मालकीण नीता अंबानी रविवारी संध्याकाळी शिर्डीला पोहोचल्या. तिथे त्यांनी साईबाबांच्या दरबारात दर्शन घेतले. मुंबई इंडियन्सने सध्या आयपीएलमध्ये सहा पैकी चार सामने गमावले आहेत. दरम्यान, नीता अंबानी यांनी शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात जाऊन येणाऱ्या काळात मुंबई इंडियन्स संघाच्या यशासाठी प्रार्थना केली. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नीता अंबानी मंदिरातून बाहेर पडत असताना, रोहित शर्माचा एक चाहता त्यांना भेटला. त्यांनी नीता अंबानीकडे "मॅडम, रोहितला कर्णधार बनवा" अशी मागणी केली. नीता अंबानींनी हात जोडून उत्तर दिले - "बाबांची इच्छा."

हे ही वाचा: IPL 2025 मध्ये नवीन पाहुण्याची एन्ट्री, मैदानातील अ‍ॅक्शन पाहून खेळाडूंना बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

 

हे ही वाचा: जसप्रीत बुमराह आणि करुण नायर एकमेकांशी भिडले...रोहितने मात्र युद्धभूमीवरही घेतली मजा; बघा Viral Video

नीता अंबानी भगवान श्रीकृष्णाच्या भक्त 

नीता अंबानी या भगवान श्रीकृष्णाच्या मोठ्या भक्त आहेत. गुजरातमधील जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाने 14 मंदिरे बांधली आहेत. विशेष म्हणजे ही मंदिरे एकाच संकुलात बांधलेली आहेत. या मंदिरांमध्ये कोरीव खांब, भित्तिचित्र शैलीतील चित्रे, प्राचीन वास्तुकलेपासून प्रेरित नमुने आणि देवी-देवतांच्या मूर्ती आहेत.

हे ही वाचा: "मला तुझ्यासोबत राहायचंय..." शिखर धवनच्या नवीन गर्लफ्रेंडने जगजाहीर केलं नातं, Video Viral

हे ही वाचा: मैदान बनली युद्धभूमी...! ऑस्ट्रेलियन खेळाडूच एकमेकांशी भिडले, मैदानातील भांडणाचा Video Viral

 

शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या नीता अंबानी यांचा व्हिडीओ आता चर्चेत आहे. याआधी, नीता अंबानी देखील त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी शिर्डीला पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी 21 दिवे लावून पूजा केली.

 

Read More