SRH vs LSG: आयपीएलमध्ये सामना सोडून अनेक गोष्टी घडत असतात. काही तर अशा विचित्र घटना असतात ज्याला बघून हसायला पण येतं तर कधी प्रश्नही पडतो. अलीकडेच हेल्मेट घोटाळा चर्चेत आला होता, जेव्हा लखनौच्या आवेश खानने विजयाचा आनंद साजरा करताना आपले हेल्मेट जमिनीवर फेकले होते. आता असेच काहीसे किस्सा पाहायला मिळाला आहे. पण यावेळी सेलिब्रेशन नाही तर रागाच्या भरात बॅट्समनने हेल्मेट मारले. या खेळाडूच्या संतापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. मात्र, यावेळी फलंदाजाने आपले हेल्मेट मैदानावर नाही तर ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांवर फेकले.
IPL 2025 चा सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स असा खेळला गेला. या सामन्यात हैदराबाद संघाकडून पुन्हा एकदा धावांची अपेक्षा होती. पण लखनौचे गोलंदाज पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याने गेम उलटला. हैदराबादचा संघ पत्त्यासारखा विखुरला. युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डी याने आपल्या खेळीने सामन्याला जीवदान दिले होते, पण नंतर 32 धावांवर त्याची विकेट गमावली.
हैदराबादचे स्टार फलंदाज अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांना काही खास कामगिरी नाही करता आली. मात्र, ट्रॅव्हिस हेडने 47 धावांची खेळी केली. रवी बिश्नोईने त्याला आउट करायच्या वेळी नितीशकुमार रेड्डी यांनी डावाची धुरा सांभाळली होती. पण त्याचीही काही वेळाने विकेट गेली. तेव्हा ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना रेड्डी रागावलेला दिसला आणि त्यांने हेल्मेट पायऱ्यांवर आपटले. त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Angry Nitish ; Throw His Helmet .#SRHvsLSG pic.twitter.com/kBP3qdVP8f
— Dhoni fan (@chiku_187) March 27, 2025
हे ही वाचा: वडील ऑटो ड्रायव्हर, ना देशांतर्गत खेळण्याचा अनुभव; IPL मध्ये पदार्पण करणारा MI चा विघ्नेश पुथूर आहे तरी कोण?
लखनौ संघाने हा सामना 5 विकेटने जिंकला. 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लखनौसाठी निकोलस पुरनने 25 चेंडूत 70 धावांची तुफानी खेळी केली.त्याचवेळी मिचेल मार्शनेही स्फोटक अर्धशतक ठोकले. गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने 4 बळी घेत हैदराबादचे कंबरडे मोडले. या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.