Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बुमराह नाही तर 'हा' स्टार गोलंदाज चौथ्या कसोटीतून होणार OUT! टीम इंडियाचे प्लानिंग जाणून घ्या

IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळला जाईल.  

बुमराह नाही तर 'हा' स्टार गोलंदाज चौथ्या कसोटीतून होणार OUT! टीम इंडियाचे प्लानिंग जाणून घ्या

IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 ते 27 जुलै दरम्यान मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तिसरा सामना भारत फार जवळ येऊन हारला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. मात्र या सामन्याआधी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

कोणाला विश्रांती देणार?

टीम इंडियाचे सहायक प्रशिक्षक रयना टेन डोशेट यांनी मोहम्मद सिराजच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं, "मागील काही वर्षांत सिराजने खूप क्रिकेट खेळली आहे. त्यामुळे त्याच्या शरीराची काळजी घेणं आता गरजेचं आहे. तो नेहमीच जास्तीत जास्त ओव्हर्स टाकायला तयार असतो. पण अशा खेळाडूंचा कार्यभार नियंत्रित करणं अत्यावश्यक आहे." डोशेट पुढे म्हणाले, "सिराजसारखा खेळाडू संघात असणं ही मोठी गोष्ट आहे. कधी कधी त्याच्या आकडेवारीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी दिसत नाही, पण त्याची जिद्द आणि लढाऊ वृत्ती बघितली, तर तो खरंच वाघ आहे. त्याच्या हातात बॉल आला की नेहमी वाटतं, काहीतरी घडणार."

हे ही वाचा: विराट कोहली पुन्हा टेस्ट मैदानात उतरणार? निवृत्तीचा निर्णय मागे घेत टीम इंडियाच्या मदतीला येणार धाऊन?

सिराजला विश्रांती मिळणार?

या वक्तव्यानंतर असा अंदाज व्यक्त केला जातोय की, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत सिराजला विश्रांती मिळू शकते. सिराजने 2023 पासून आतापर्यंत सर्वात जास्त षटकं टाकणारा भारतीय वेगवान गोलंदाज म्हणून कामगिरी केली आहे. मागच्या 27 कसोटींमध्ये त्याने 24 सामने खेळले आहेत आणि तब्बल 569.4 षटकं टाकत 67 विकेट्स घेतल्या आहेत.

हे ही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द! मॅच खेळायला खेळाडूंचा नकार

 

बुमराहच्या पुनरागमनाची शक्यता

दुसरीकडे, भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीत खेळू शकतो. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की बुमराहला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील तीन सामन्यांमध्ये खेळवण्याचा प्लॅन आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून बुमराहने एजबेस्टनमध्ये तिसरी कसोटी खेळली नाही. मात्र आता मालिकेतील चौथा सामना निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने बुमराहला मॅंचेस्टरमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

हे ही वाचा: IND vs ENG: ना नायर, ना अय्यर... 'हा' फलंदाज आहे नंबर-3 चा खरा दावेदार!

दरम्यान, असेही बोलले जात आहे की बुमराहला अंतिम कसोटीत पुन्हा विश्रांती दिली जाईल.

Read More