Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ऑरेंज कॅप ते पॉईंट टेबल सगळीकडेच 'गुलाबी गँग'चा जलवा

गेल्या हंगामात सपशेल फेल ठरलेल्या टीमची या हंगामात मोठी आघाडी पॉईंट टेबलमध्ये टॉप 3 कोण?

ऑरेंज कॅप ते पॉईंट टेबल सगळीकडेच 'गुलाबी गँग'चा जलवा

मुंबई : आयपीएलचा तिसरा आठवडा सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यामध्ये अत्यंत चुरशीचे सामने झाले आहेत. टीममध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. गेल्या हंगामात सपशेल फेल ठरलेली टीम या हंगामात सर्वात जास्त स्ट्राँग असल्याची प्रचिती वेळोवेळी येत आहे. 

राजस्थान टीम गेल्यावर्षी प्ले ऑफपर्यंत पोहोचणंही कठीण होतं. यंदा पॉईंट टेबलवर पहिल्या स्थानावर आहे. पॉईंट टेबलवर 4 पैकी 3 सामने जिंकून राजस्थान टीम पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर कोलकाता टीम 5 पैकी 3 सामने जिंकून आहे. 

पॉईंट टेबलवर तिसऱ्या स्थानावर गुजरात टीम तर चौथ्या स्थानावर बंगळुरू आहे. पाचव्या स्थानावर लखनऊ टीम आहे. लखनऊ टीमने 5 पैकी 3 सामने जिंकले तर 2 गमावले आहेत. कोलकाता, गुजरात आणि लखनऊ टीममध्ये चुरस पाहायला मिळत आहे. 

ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये राजस्थानच्या खेळाडूने बाजी मारली. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये राजस्थानचा जोस बटलर 218 धावा करून सर्वात पुढे आहे. त्यामागोमाग 188 धावा करणारा  क्विंटन डी कॉक आहे.

पर्पल कॅपच्या रेसमध्ये राजस्थानची हवा असून पहिल्या स्थानावर युजवेंद्र चहल आहे. त्याने 11 विकेट्स घेतल्या. त्यापाठोपाठ  उमेश यादव आहे. ही स्पर्धाही दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत आहे. पण सर्वात मजेशी गोष्ट म्हणजे सध्या तिन्हीवर गुलाबी गँगने आपलं नाव कोरल्याचं दिसत आहे. 

Read More