Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

PAK vs ENG: 3 दिवस, 1150 धावा अन् 7 शतकं...145 वर्षांचा इतिहास बदलणार का?

Cricket History marathi news: टोटल 5 दिवसांच्या सामन्यात फक्त 3 दिवस खेळले गेले आहेत. त्यात 1150 हून अधिक धावा झाल्या आहेत. एवढंच नाही तर 7 फलंदाजांनी शतकही ठोकलं आहे. 

PAK vs ENG: 3 दिवस, 1150 धावा अन् 7 शतकं...145 वर्षांचा इतिहास बदलणार का?

PAK vs ENG 1st Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानावर (Rawalpindi) खेळला जातोय. या सामन्यात फलंदाजांच्या बॅटीमधून धावांचा पाऊस पडत असल्याचं पहायला मिळतंय. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 657 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा (PAK vs ENG 1st Test) संघही इंग्लंडला कडवी झुंज देतोय. पाकिस्तानने देखील 499 धावा करत सामान्यातील आव्हान कायम ठेवलंय.

टोटल 5 दिवसांच्या सामन्यात फक्त 3 दिवस खेळले गेले आहेत. त्यात 1150 हून अधिक धावा झाल्या आहेत. एवढंच नाही तर 7 फलंदाजांनी शतकही ठोकलं आहे. कॅप्टन बाबर आझमच्या (Babar Azam) शतकाच्या जोरावर पाकिस्तानने शनिवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात 7 बाद 499 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक (Abdullah Shafique), इमाम उल हक (Imam-ul-Haq) आणि बाबर आजमने (Babar Azam) शतक ठोकलंय.

पहिल्या डावात जैक क्रॉले (Zak Crawley), बेन डकेट (Duckett) ,ओली पोप (Ollie Pope) आणि हैरी ब्रुक (Harry Brook) या 4 फलंदाजांनी शतक ठोकलंय. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये टी-ट्वेंटी अनुभव सध्या पाकिस्तानमध्ये पहायला मिळतोय. दोन्ही संघांनी मिळून आत्तापर्यंत 3 दिवसात 1150 धावा केल्यात त्यामुळे आता येणाऱ्या 2 दिवसात आणखी किती धावा मैदानावर निघणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आणखी वाचा - Watch: ये भावा काय करू राहिलाsss, बॉल चमकवण्यासाठी Joe Root ने लढवली अनोखी शक्कल; Video तुफान व्हायरल!

दरम्यान, इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. कसोटीचा 145 वर्षांचा इतिहास (Cricket History) एका सामन्यात बदलू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत एका कसोटीत जास्तीत जास्त 8 शतकं झळकावली आहेत. अशातच इंग्लंड आणि पाकिस्तानच्या (PAK vs ENG) कसोटीत आणखी 2 शतकं केली तर नवा विश्वविक्रम नोंदवला जाईल. 2005 मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका (WI vs SA) यांच्यात झालेल्या कसोटीत 8 शतकांचा रेकॉर्ड आहे.

Read More