Agha Salman bleeding after the ball hit : आशिया कपच्या सुपर फोरमधील सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 228 धावांनी विक्रमी विजय साजरा केलाय. वन डे क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचं लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 32 षटकांत 128 धावांमध्येच आटोपला. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. त्यामुळे टीम इंडियाने 228 धावांनी विजय मिळवला आहे. मात्र, या सामन्यात मोठी दुर्घटना पहायला मिळाली.
झालं असं की, सामन्याची 21 वी ओव्हर सुरू होती. रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध स्पिन अटॅक सुरू केला. रवींद्र जडेजा हा गोलंदाजी करत होता. तर आगा सलमान फलंदाजी करत होता. स्पिन सुरू झाली म्हटल्यावर आगाने मोठ्या हुशारीत हेल्मेट काढून ठेवलं. मात्र, जडेजाच्या एका चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात सलमानला जोराचा फटका बसला. बॉल एवढा फास्ट आला की सलमानला काहीत कळलं नाही. बॉल पडला तेव्हा तो थोडा खाली झुकला आणि त्याने बॅट आडवी केली. मात्र, जड्डूचा टप्पा अचूक... त्याने टप्प्यात गोलंदाजी केली अन् बॉल सलमानच्या बॅटच्या कडेवर लागला. त्यानंतर बॉल थेट सलमानच्या चोहऱ्यावर आदळला.
चेहऱ्यावर बॉल आदळ्यानंतर सेकंदात रक्त वाहू लागलं. रक्त थांबायचे नावच घेत नाही, हे पाहुन विकेटकिपर केएल राहुल सलमानकडे धावला अन् त्याला चेहरा उभा करण्याची सुचना केली. पाकिस्तानच्या संघाचे डॉक्टर धावत मैदानात आले. डॉक्टरांनी सलमानवर तातडीने उपचार केले. थोडा वेळ मॅच थांबल्यानंतर सर्वकाही सुरळीत झालं अन् सलमान पुन्हा मैदानात फलंदाजी करू लागला. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव आल्याचं दिसलं. पुन्हा फलंदाजीला आल्यावर तो हेल्मेट घालायचं विसरला नाही.
Chin Up Agha Salman!!!
— Muhammad Ali (@AliFF312) September 11, 2023
Nation Is Behind You .
It Hurts .#ViratKohli #indvspak2023#IndiaVsPakistan#INDPAK #indvspak2023 #AbhishekhMalhan#Abhiya #Abhisha#AsiaCup2023#BehindYouSkipper pic.twitter.com/P4cEsoYbuY
दरम्यान, भारताने मोठा विजय मिळवला आणि त्यामुळे रन रेट चांगलाच वाढला आहे. या सामन्यानंतर भारताचा रन रेट हा 4.560 एवढा झाला आहे. गुणतालिकेत हा सर्वात जास्त रन रेट आहे. भारत या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला असल्याने आता फायनलचा टेन्शन आता संपलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.