PAK VS NZ : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची सीरिज खेळवण्यात आली. या सीरिजचा शेवटचा सामना हा शनिवारी 4 एप्रिल रोजी खेळवण्यात आला. बे ओवल, माउंट माउंगानुई येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर 43 धावांनी विजय मिळवला. पावसामुळे हा सामना 42 ओव्हरचा करण्यात आला होता. डे अँड नाईट खेळवण्यात आलेल्या या सामन्यात गोंधळ उडाला. सामन्या दरम्यान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. जेव्हा मैदानातील फ्लडलाइट्स अचानक बंद झाली आणि स्टेडियममध्ये अचानकपणे अंधार झाला.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान 39 व्या ओव्हरला ही घटना घडली. यावेळी न्यूझीलंडचा संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरला होता आणि पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत होता. जैकब डफी तैयब ताहिर हा चौथा बॉल टाकत होता, त्याने रनअप घ्यायला सुरुवात केली आणि बॉल टाकणार तेवढ्यात मैदानावरील फ्लड लाईट्स बंद झाल्या. फलंदाज तैयब ताहिर घाबरून दुखापत होऊ नये म्हणून बाजूला झाला. अखेर त्याच दैव बलवत्तर म्हणून त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. कारण गोलंदाजाने बॉल टाकला असता तर मैदानात खेळाडूंना गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर काहीकाळ सामना थांबवण्यात आला होता.
Cricket Lover (cricfan98) April 5, 2025
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पूर्वी झालेल्या एका सीरिज दरम्यान ओडिशा येथे अशीच घटना घडली होती. ओडिशा स्टेडियमवर भारताकडून रोहित आणि शुभमन हे दोघे बॅटींग करत होते आणि तेवढ्यात लाईट बंद झाली होती. बराचकाळ खेळ थांबवण्यात आला आणि मग पुन्हा खेळ सुरु करण्यात आला.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवण्यात आली. या सीरिजमध्ये तीनही सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून पाकिस्तानवर 3-0 ने मात करून व्हाईट वॉश दिला. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 265 धावांचे आव्हान दिले होते. पण हे आव्हान पूर्ण करताना पाकिस्तानला फक्त 221 धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडचा 43 धावांनी विजय झाला.