Shahid Afridi on Team India Win: 9 मार्च ही तारीख टीम इंडियासाठी खूपच ऐतिहासिक ठरली. चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करण्यात भारताला यश आपले. दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंड सोबत भिडला. या सामन्यात घवघवीत यश मिळवून भारताच्या विजेतेपदाचा नाद जाहभर पसरला. यामुळे यजमान पाकिस्तानला वेदनांचा दुहेरी डोस मिळाला. हायब्रीड मॉडेलमुळे टीम इंडियाने आपले सर्व सामने दुबईच्या मैदानावरच खेळले. त्यामुळे शाहिद आफ्रिदीनेही खेळपट्टीच्या स्थितीबाबत भारताच्या विजयावर आपले मौन तोडले, ज्यात त्याचा सूर बदलल्याचे दिसत होता.
शाहिद आफ्रिदी टीम इंडियाच्या विजयावर म्हणाला की, "त्यांचे देशांतर्गत क्रिकेट उत्कृष्ट आहे. त्याने या स्पर्धेसाठी सर्वोत्तम निवड केली. मला माहित आहे की भारताचे ठिकाण बदलले नाही, त्यामुळे त्यांना दुबईची परिस्थिती आणि खेळपट्टीवरील फिरकी गोलंदाज आणि गोलंदाजांचे रोल आधीच माहित होती. त्यांना खेळपट्टीचा फायदा होता, हे त्यांच्या विजयाचे मोठे कारण आहे. मात्र, खेळपट्टीनुसार त्याने उत्तम संघ निवडला."
आफ्रिदी पुढे म्हणाला, " मी म्हणेन की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जरी जागतिक संघ बनवला असता आणि दुबईत भारताविरुद्ध खेळलो असतो तरी टीम इंडिया जिंकली असती." चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान खेळपट्टीचा मुद्दा बराच गाजला होता. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रॅसी व्हॅन डर डुसेननेही टीम इंडियाच्या फायद्यांविषयी सांगितले. मात्र, उपांत्य फेरीतच न्यूझीलंडकडून आफ्रिकन संघ बाहेर पडला.
खेळपट्टीच्या फायद्यावर गौतम गंभीर म्हणाला होता की हे फक्त एक निमित्त आहे. भारतीय संघ आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सराव करतो. गंभीर म्हणाला की, ज्याला टीका करायची असते तो करतो.स्थळ एकच असतानाही भारतीय संघ दुबईतील वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर सामने खेळला.