Pakistan vs Sri Lanka : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये वर्ल्ड कपमधील (World Cup) आठवा सामन्यात (SL vs PAK) पाकिस्तानने श्रीलंकेचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेने दिलेलं धावांचं आव्हान पूर्ण केलं अन् आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 345 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला पूर्ण करताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) या दोघांनी शतक ठोकलं अन् सामना खिशात घातला आहे. पाकिस्तानने 6 गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. या सामन्यात एकूण 4 शतकं पहायला मिळाली.
श्रीलंकेने दिलेल्या 345 धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तानची पडझड झाली. मागील सामन्याप्रमाणे इमाम-उल-हक लवकर बाद झाला. तर नंबर तीनवर फलंदाजी करण्यास आलेल्या बाबरला देखील लय सापडली नाही. कॅप्टन बाबर देखील 10 धावा करत बाद झाला. त्यानंतर मात्र, पाकिस्तानने सावध फलंदाजी केली. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) यांनी हळूवार सुरूवात केली अन् हात बसल्यानंतर आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंनी शतक झळकावलं. श्रीलंकेच्या कमजोर फिल्डिंगचा फटका बसला. अखेर पथिरानाने शफीकची विकेट घेतली. त्यानंतर देखील रिझवानने अखेरपर्यंत हिंमत गमावली नाही आणि पाकिस्तानचा विजय मिळून दिला.
Four fifties and a century in his last seven ODI innings
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 10, 2023
Incredible consistency from @iMRizwanPak #PAKvSL | #DattKePakistani | #WeHaveWeWill pic.twitter.com/x3dR9lWdWT
त्यापूर्वी फलंदाजी करताना, श्रीलंकेची सुरूवात देखील चांगली झाली नाही. कुशल परेरा देखील यावेळी फेल ठरला. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी मोर्चा सांभाळला. त्यावेळी कुसल मेंडिसने घेर बदलले अन् त्याने आक्रमक फलंदाजी केली. निसंका बाद झाल्यानंतर सदिरा समरविक्रमाने मेंडिसला साथ दिली अन् दोन्ही खेळाडूंनी शतक ठोकलं. पाकिस्तानप्रमाणे श्रीलंकेच्या दोन्ही खेळाडूंनी शतक ठोकलं. मात्र, सामन्यात पाकिस्तानचं पारडं जड राहिलंय. अखेरीस धनंजय डी सिल्वा आक्रमक धावा करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे श्रीलंकेने 345 धावांचा डोंगर उभारला होता.
Rohit Sharma : वर्ल्ड कपच्या सुरूवातीलाच मोठा धक्का! टीम इंडियाचा 'म्होरक्या' जखमी
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालगे, महेश तिक्षणा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका.