Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताचा निर्णय पाकिस्तानला झोंबला! पुन्हा कधीच 'या' स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय

WCL 2025 : भारताने सेमी फायनल सामन्यातून माघार घेतल्याने पाकिस्तानचा संघ थेट फायनलमध्ये पोहोचला पण त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भविष्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये (WCL 2025) सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारताचा निर्णय पाकिस्तानला झोंबला! पुन्हा कधीच 'या' स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय

WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 मध्ये 30 जुलै रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार होता. मात्र पहलगाम हल्ल्याच्या पाश्वभूमीवर भारताने पाकिस्तान विरुद्ध हा सामना खेळण्यास नकार दिला आणि थेट स्पर्धेतून माघार घेतली. याआधी सुद्धा स्पर्धेतील एका ग्रुप स्टेज सामन्यातून भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. भारताने सेमी फायनल सामन्यातून माघार घेतल्याने पाकिस्तानचा संघ थेट फायनलमध्ये पोहोचला पण त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भविष्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये (WCL 2025) सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे की, 'इंडिया लीजेंड्सने पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर WCL च्या विधानांमध्ये आणि कृतींमध्ये स्पष्टपणे पक्षपातीपणा आणि दुटप्पीपणा दिसून आला'.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहसिन नकवीच्या अध्यक्षतेखाली व्हर्च्युअल रूपात आयोजित झालेल्या 79 बोर्ड ऑफ गवर्नर्स (BOG) बैठकीच्या दरम्यान WCL ने ज्या प्रकारे पाकिस्तान संघासोबत व्यवहार केला त्याने गंभीर निराशा झाली असल्याचं सांगण्यात आलं. पीसीबीने म्हटले आहे की, सामन्यातून जाणूनबुजून माघार घेणाऱ्या संघाला पॉईंट्स देणे आणि भारत-पाकिस्तान लेजेंड्स सामना रद्द करण्याबाबतचे प्रेस रिलीज दोन्ही पक्षपाती आणि ढोंगीपणाचे होते.

हेही वाचा : IPL 2026 साठी CSK चा कॅप्टन कोण असेल? 'थाला'ने अखेर दिला संकेत; ऑक्शन, फिटनेस आणि निवृत्तीवरही व्यक्त केलं मत

 

पीसीबीने जाहीर केलं स्टेटमेंट : 

पीसीबीने म्हटले की, 'प्रेस रिलीजमध्ये ज्या निवडक पद्धतीने 'खेळातून शांतता' बद्दल बोलले गेले आहे ते ढोंगीपणा दर्शवते. तसेच हे स्पष्ट करते की क्रीडा स्पर्धा राजकीय स्वार्थ आणि मर्यादित व्यावसायिक हितसंबंधांसाठी अधीन केल्या गेल्या आहेत'. या दुर्दैवी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, जे बाह्य दबावांचा स्पष्ट आणि असह्य प्रभाव आणि खेळातील निष्पक्षतेच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष अधोरेखित करते. या सर्व कारणांमुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. पीसीबी आता अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देऊ शकत नाही जिथे निष्पक्ष खेळ आणि स्वतंत्र प्रशासन यासारख्या मूलभूत तत्त्वांना बाहेरील हस्तक्षेपामुळे तडजोड केली जाते'. 

Read More