Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तुझी उत्कटता आणि तीव्रता...', भारत - पाक तणावादरम्यान पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची विराट कोहलीसाठी पोस्ट

Virat Kohli Test Retirement : विराटच्या निवृत्ती विषयी जगभरातून अनेक प्रतिक्रिया येत असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील पोस्ट शेअर केली आहे. 

'तुझी उत्कटता आणि तीव्रता...', भारत - पाक तणावादरम्यान पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची विराट कोहलीसाठी पोस्ट

Virat Kohli Test Retirement : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी त्याने सोशल मीडियावर ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी सुद्धा विराटने वर्ल्ड कप 2024  नंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केलेली होती. विराटची टेस्ट कारकीर्द ही अतिशय लक्षवेधी ठरली. तो आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. विराटच्या निवृत्ती विषयी जगभरातून अनेक प्रतिक्रिया येत असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील पोस्ट शेअर केली आहे. 

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

भारत - पाकिस्तान यांच्यात तणाव असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याने भारतीय सैन्याविषयी अनेक चुकीची विधान केली. मात्र विराटच्या निवृत्तीनंतर तो भारताच्या या स्टार क्रिकेटरचं कौतुक करताना मागे हटला नाही. शाहिद आफ्रिदीने पोस्ट करत म्हटले की, 'विराट कोहलीच्या उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल अभिनंदन. तुझी आवड, तीव्रता आणि व्यावसायिकता यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये नवीन मानके निर्माण केली आहेत. या फॉरमॅटला  तुझी उपस्थिती आणि स्पर्धात्मक वृत्तीची कमतरता भासेल'.

हेही वाचा : विराट , डेनिस, थॉमसन... पाकिस्तानला धडा शिकवल्यावर भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत का घेण्यात आली 3 क्रिकेटर्सची नावं?

 

काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

विराटच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील एक भावुक पोस्ट लिहिली. तो म्हणाला, 'तू कसोटीतून निवृत्त होत असताना 12 वर्षांपूर्वी माझ्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान तू केलेल्या विचारशील कृतीची मला आठवण येतेय. तू तुझ्या दिवंगत वडिलांकडून मला एक धागा भेट देण्याची ऑफर दिली होतीस. ती गोष्ट स्वीकारणे माझ्यासाठी खूप वैयक्तिक होते. पण ती कृती हृदयस्पर्शी होती. तेव्हापासून ती वस्तू माझ्यासोबत आहे. माझ्याकडे त्या बदल्यात देण्यासाठी एक धागा नसला तरी तुझ्या कृतीचं खूप कौतुक आणि तुला खूप शुभेच्छा'. 

विराट कोहलीची टेस्ट कारकीर्द : 

विराटने आतापर्यंत क्रिकेटचे तीनही फॉरमॅट मध्ये एकूण 539  सामने खेळले आहेत.   विराटने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत. त्याने 302 वनडे सामन्यात 51 शतकांसह 14181 धावा, टी20 मध्ये 1 शतकासह 4188 धावा केल्या आहेत.   

 

Read More