Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटरचे कापण्यात आले दोन्ही पाय, कारण ऐकून धक्का बसेल

Pakistan Cricket  : पाकिस्तानी क्रिकेटमधून एक अशी धक्कादायक माहिती समोर आलीये ज्यामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानातील एका हिंदू क्रिकेटरला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. 

पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटरचे कापण्यात आले दोन्ही पाय, कारण ऐकून धक्का बसेल

Pakistan Cricket  : अनेकदा क्रिकेट खेळताना खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागतो, काहीवेळा या दुखापती किरकोळ असतात तर काहीवेळा या फारच गंभीर असतात. काही खेळाडूंना तर दुखापतीच्या कारणामुळे निवृत्ती सुद्धा घ्यावी लागलेली आहे. पाकिस्तानी क्रिकेटमधून एक अशी धक्कादायक माहिती समोर आलीये ज्यामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानातील एका हिंदू क्रिकेटरला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. 

पाकिस्तानातील या हिंदू क्रिकेटरचं नाव मोहिंदर कुमार असं असून त्याने पाकिस्तानसाठी फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेट खेळले आहे. पाकिस्तानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारे माजी क्रिकेटर आणि कोच मोहिंदर कुमार यांचे दोन्ही पाय कापण्यात आले आहेत. याचं मागचं कारणही खूप वेदनादायक आहे. मोहिंदर कुमार हे पाकिस्तानच्या अवघ्या काही हिंदू क्रिकेटर्सपैकी एक आहे. मोहिंदर कुमार यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. परंतु तो पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळू शकला नाही. काहीकाळानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट कोच म्हणून काम सुरु केलं. 

हेही वाचा  : एलिमिनेटर मॅचपूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! 'या' 3 खेळाडूंनी सोडली साथ; गुजरात विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेईंग 11?

 

का कापण्यात आले पाय?

पाकिस्तानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेले मोहिंदर कुमार हे मागील काही वर्षांपासून डायबेटिजचे रुग्ण होते. डायबेटिजमुळे त्याच्या पायात इन्फेक्शन झालं होतं. ते पायाचं इन्फेक्शन इतकं वाढलं कि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. डॉक्टरांकडे त्याचे दोन्ही पाय कापण्याखेरीज काही दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे त्याचे दोन्ही पाय कापण्यात आले, या माहितीने क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. 

मोहिंदर कुमारचं क्रिकेट करिअर :

माजी क्रिकेटर मोहिंदर कुमारने 1976 से 1994 पर्यंत पाकिस्तानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलं. त्याने 65 फर्स्ट क्लास सामने, 53 लिस्ट ए सामने खेळले. तो एक वेगवान गोलंदाज होता, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 187 विकेट घेतले. त्याने 10 वेळा 5 पेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. 4 वेळा त्याने 10 विकेट घेतले. एवढं असूनही त्याला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. यामागचं एक कारण तो हिंदू असणं हे सुद्धा होतं. 65 वर्षीय मोहिंदरने अनेक मोठ्या खेळाडूंना ट्रेनिंग दिलं. यात मोहम्मद सामी, दानिश कनेरिया, तनवीर अहमद, सोहैल खान यांचा देखील समावेश होता. 

Read More