Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक! युट्युबनंतर आता पाकिस्तानच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही भारतात बंदी

Cricket : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या युट्युब चॅनलवर सुद्धा भारतात बंदी घालण्यात आली होती. आता पाकिस्तानचे क्रिकेटर्स, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक! युट्युबनंतर आता पाकिस्तानच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही भारतात बंदी

Cricket : जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. पाकिस्तान क्रिकेट सुद्धा भारताच्या रडारवर असून भारतात पाकिस्तान सुपर लीगचं स्ट्रीमिंग सुद्धा बंद झालंय. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या युट्युब चॅनलवर सुद्धा भारतात बंदी घालण्यात आली होती. आता पाकिस्तानचे क्रिकेटर्स, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या जवळपास प्रत्येक प्रसिद्ध व्यक्ती आणि इन्फ्लुएन्सरचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बॅन करण्यात आले आहेत. यातून पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटर्सना सुद्धा सूट देण्यात आलेली नाही. पाकिस्तानचे स्टार क्रिकेटर्स बाबर आजम, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद रिजवान सहित सर्वच पाकिस्तानी खेळाडूंचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात बॅन करण्यात आलंय. त्यामुळे पाकिस्तानवर एकावर एक डिजिटल स्ट्राईक केली जातेय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर मोठा परिणाम होणार आहे. 

पाकिस्तानचे युट्युब चॅनलही बॅन : 

फक्त इंस्टाग्राम अकाऊंटचं नाही तर यापूर्वी पाकिस्तानचे युट्युब चॅनल सुद्धा भारतात बॅन करण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या युट्युबर्सना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या युट्युब चॅनलमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरचा सुद्धा समावेश आहे. पाकिस्तानचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बॅन केल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आता भारतात दिसणार नाहीत. 

हेही वाचा : शाहिद आफ्रिदी भारताचा इतका द्वेष का करतो? खरं कारण आलं समोर, भारतीय जवानांनी त्याच्या भावावर...

 

PSL ची लाईव्ह स्ट्रीमिंग बंद : 

PSL ची लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात बंद झाल्याने पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने आयसीसीला विनंती केली आहे की पुढील आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांना एकाच ग्रुपमध्ये ठेऊ नये. भारत आणि पाकिस्तान हे संघ जेव्हा जेव्हा मैदानात आमने सामने येतात, तेव्हा तेव्हा त्यातून खूप मोठी कमाई होत असते. 

Read More