Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

...म्हणून मी सोबत नेहमी उशी ठेवतो, व्हायरल फोटोवर मोहम्मद रिझवानचं स्पष्टीकरण

पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिझवानचा (Mohammad Rizwan) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

...म्हणून मी सोबत नेहमी उशी ठेवतो, व्हायरल फोटोवर मोहम्मद रिझवानचं स्पष्टीकरण

दुबई : पाकिस्तान टीम या टी 20 वर्ल्ड कप 2021 साठीचा प्रबळ विजेता संघ समजला जात होता. मात्र टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. त्यानंतर पाकिस्तान टीम दुबईला परतली. पाकिस्तान दुबईवरुन मायदेशी परतणार आहे. यादरम्यान पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिझवानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत रिझवान हातात सफेद उशी घेतलेला दिसून येत आहे. रिझवान सोबत ही उशी का ठेवतो, यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. रिझवान सोबत उशी का ठेवतो, याचं कारण त्यानेच सांगितलं आहे. (Pakistan wicketkeeper Mohammad Rizwan explained why he always carries a pillow with him)

रिझवान काय म्हणाला?

"मी ही उशी वैद्यकीय कारणांमुळे वापरतो. मानेला आधार देण्यासाठी तसेच मानेसंदर्भात काही त्रास होऊन नये यासाठी मी ही उशी वापरतो. एक विकेटकीपर म्हणून मला मानेचा त्रास होतो. विकेटकीपिंग आणि बॅटिंग करताना मी  कायम हेल्मेट घालतो. यामुळे अनेकदा मानेचे स्नायू घट्ट होतात. त्यामुळे मी ही उशू वापरतो, जेणेकरुन आराम मिळेल. तुम्हाला जेव्हा जाणवतं की तुम्ही आजारातून बरे होताय, तेव्हा चांगली झोप घेणं गरजेचं असतं", असं रिझवानने उशीच्या वापरावर स्पष्टीकरण दिलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटर हॅन्डलवरुन एक व्हीडिओ शेअर केला आहे. 
 
जोखीम पत्करायची नाही

मला कोणतीच जोखीम घ्यायची नाहीये. त्यामुळे मी नेहमीच सोबत उशी ठेवतो. "तुम्ही मला अनेकदा उशी सोबत घेऊन प्रवास करताना पाहिलं असेल. मला मानेच्या संदर्भात कोणतीच जोखीम पत्करायची नाही. मी या उशीशिवाय एका रात्रही राहू शकत नाही. त्यामुळे मी नेहमी ही उशी सोबत ठेवतो, जेणेकरुन कोणत्याही त्रासाचा सामना करावा लागू नये", असंही रिझवानने स्पष्ट केलं.

Read More