Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

"त्यांना क्रिकेटमधलं काही कळत नाही..." शाहिद आफ्रिदीने PCB चेअरमनचा जाहीरपणे केला अपमान!

 Shahid Afridi on Pcb Chairman Mohsin Naqvi: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान हा यजमान संघ होता, पण तो साखळी फेरीतूनच बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पीसीबी अध्यक्षांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या लीग स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. पाकिस्तान या स्पर्धेतील यजमान संघ होता. इतकंच नाही तर पाकिस्तान संघ गतविजेताही होता. परंतु या सिजनमध्ये या संघाला साखळी टप्प्यात एकही सामना जिंकू शकला नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेटमधील लोक एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. अलीकडेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पीसीबी (PCB) अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी? 

माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पीसीबी चेअरमन मोहसिन नक्वी यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आफ्रिदीने सांगितले की, जेव्हा तो मोहसिन नक्वीशी बोलला तेव्हा पीसीबी प्रमुखांनी त्याला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले. क्रिकेट बोर्ड चालवणाऱ्या प्रमुखाला या खेळाबाबत काहीच माहिती नाही ही एक मोठी गोष्ट आहे.

हे ही वाचा: 'हा' आहे एकाच कसोटी सामन्यात हॅटट्रिक आणि शतक झळकावणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू

 

मोहसिन नक्वी हे राजकारणी राहिले आहेत

मोहसिन नक्वी यांची ओळख राजकारणी अशी आहे. समा टीव्हीशी बोलताना आफ्रिदी मोहसिन नक्वीबद्दल म्हणाला, "मी काही दिवसांपूर्वी लाहोरमध्ये अध्यक्षांना भेटलो होतो. मैदानाचा उपक्रम, गद्दाफी स्टेडियमवर केलेले काम खूप चांगले आणि सुंदर आहे. त्याने काम केले आहे आणि त्याला पुढेही काम करायचे आहे, पण क्रिकेटबद्दलची त्याची विचारसरणी वेगळी होती." 

हे ही वाचा: 'धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला...', पाकिस्तानच्या हिंदू क्रिकेटरने व्यक्त केल्या भावना

 

आफ्रिदीने नक्वीवर निशाणा साधला की, तो स्वत:ला अशा नोकरशहांशी जोडतो ज्यांना क्रिकेटबद्दल काहीच माहिती नाही. ते म्हणाले, "अध्यक्षांना क्रिकेटबद्दल काहीच माहिती नाही. जेव्हा तुम्हाला क्रिकेटबद्दल काहीही माहिती नसते तेव्हा तुम्ही चांगल्या, तांत्रिक लोकांसोबत काम केले पाहिजे ज्यांचा खेळाशी काही संबंध आहे."

Read More