Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तानच्या कोचचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज! भारत Vs पाक सामन्यापूर्वी केलेल्या वक्तव्याने उडाली खळबळ

Champions Trophy 2025 India vs Pakistan: पाकिस्तानच्या डोक्यावर टांगती तलवार असताना त्यांचा अहंकार काही कमी होत नसल्याचं दिसतंय. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे कोच आकिब जावेद यांनी टीम इंडियाला खुलं चॅलेंज दिलंय. 

पाकिस्तानच्या कोचचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज! भारत Vs  पाक सामन्यापूर्वी केलेल्या वक्तव्याने उडाली खळबळ

Pakistan Coach Akib Javed Statement ahead IND VS PAK Match: रविवार 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) सामन्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) आतापर्यंत 4 सामने पार पडले असून भारत आणि पाकिस्तान यांनि प्रत्येकी एक सामना खेळला आहे. यात भारताने बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केला तर यजमान पाकिस्तानला मात्र न्यूझीलंडकडून तब्बल 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताविरुद्ध सामना काहीही करून जिंकावा लागेल तर भारताने आजचा सामना जिंकल्यास ते थेट सेमी फायनल गाठतील. पाकिस्तानच्या डोक्यावर टांगती तलवार असताना त्यांचा अहंकार काही कमी होत नसल्याचं दिसतंय. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे कोच आकिब जावेद यांनी टीम इंडियाला खुलं चॅलेंज दिलंय. 

काय म्हणाले आकिब जावेद ?

भारत - पाक सामन्यापूर्वी शनिवारी दुबईत पत्रकार परिषद पार पडकली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे हेड कोच आकिब जावेद यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. आकिब जावेद म्हणाले, 'तुम्हाला आमची प्लेइंग ईलेव्हन टॉसनंतर समजेल. टीम इंडियासाठी सरप्राईज असेल. जर टीम इंडिया 3 ते 4 स्पिनर्ससह उतरणार असेल तर तो त्यांचा प्लॅन असू शकतो. मात्र आम्ही आमच्या ताकदीसह मैदानात उतरु'. असं म्हणून पाकिस्तानच्या प्लेईंग 11 विषयी सस्पेन्स आकिब जावेद यांनी वाढवला. तसेच ते पुढे म्हणाले की, 'ज्यावेळी तुम्ही तुमच्या ताकदीवर खेळता, ज्यामुळे संघात अधिक बदल होत नाहीत. आम्ही जो संघ निवडलाय, त्यावर मला विश्वास आहे. दुसरा संघ करतोय म्हणून आम्हीही तसं करतोय, असं होत नाही'.]

हेही वाचा : पाकिस्तानात वाजलं भारताचं राष्ट्रगीत! प्रेक्षकांनी केली आरडाओरड, मॅच दरम्यान नेमकं काय घडलं?

 

कसा आहे भारत - पाक हेड टू हेड रेकॉर्ड?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत भारत - पाकिस्तान हे दोन संघ 5 वेळा आमने-सामने आले आहेत.  यापैकी 3 वेळा भारताने तर 2 वेळा पाकिस्तानने विजय मिळवलाय. 19 सप्टेंबर 2004 रोजी झालेल्या सामन्यात 3 विकेट्सने पाकिस्तानचा विजय झाला होता. तर 26 सप्टेंबर 2009 रोजी झालेल्या सामन्यात 54 धावांनी पाकने भारतावर विजय मिळवला होता. तर 2017 रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सुद्धा पाकिस्तानने भारतावर विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. तर भारताने 15 जून  2013 रोजी पाकिस्तानवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. तर 14 जून रोजी झालेल्या सामन्यात भारताने 124 धावांनी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी

About the Author

Pooja Pawar 

... Read more
Read More