Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भररस्त्यात बाबर आझम चाहत्यांशी भिडला, स्वतःच्याच चाहत्यांशी केलेल्या झटापटीचा Video Viral

Babar Azam Fight: पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.   

 भररस्त्यात बाबर आझम चाहत्यांशी भिडला, स्वतःच्याच चाहत्यांशी केलेल्या झटापटीचा Video Viral

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये बाबर रस्त्यावर चाहत्यांशी वाद घालताना आणि एका तरुणाला जोरात झटकताना दिसतोय. व्हिडीओमध्ये तो काहीसा त्रस्त दिसत आहे  आणि त्याची बॉडी लँग्वेज बऱ्यापैकी आक्रमक दिसत आहे.

भांडणाचे कारण काय? 

घटनेमागचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, पण चर्चा आहे की बाबरच्या T20 संघातून वगळल्यावर त्याच्यावर काही चाहत्यांनी टीका केली होती, ज्यामुळे हा वाद निर्माण झाला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर बाबर संघाबाहेर गेल्याने अनेकजण त्याच्यावर संतप्त झाले आहेत. 

 

याआधीही घडली होती सेम घटना 

याआधीही कार्डिफमध्ये बाबर आझमसोबत सेन अशीच एक घटना घडली होती. तेव्हा चाहत्यांनी सेल्फीसाठी त्याला घेरलं होतं आणि त्याने सुरक्षारक्षकांना गर्दी हटवायला सांगितलं होतं. त्यावेळीही त्याचा राग दिसून आला होता.

बॉर्डर लाईन असणे आवश्यक 

हे सर्व प्रकार खेळाडू आणि चाहत्यांमधील बॉर्डर कुठे असाव्यात, यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात. एकीकडे चाहत्यांचं प्रेम खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचं असतं, पण त्याचवेळी त्यांचं खासगी आयुष्य आणि मानसिक शांतताही तितकीच गरजेची आहे.

पाकिस्तान सुपर लीग

दरम्यान, पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2025 दरम्यान बाबर आझम आणि इंग्लंडच्या सॅम बिलिंग्स यांच्यात एक मजेशीर गोष्ट घडली. बाबरने 47 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तिथेच सॅम बिलिंग्सने केवळ 19 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं. बिलिंग्सने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या दोघांच्या खेळींची तुलना करत मजेशीर पद्धतीने बाबरची फिरकी घेतली. दोघांनीही आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, पण स्कोरिंग स्पीडमधील तफावत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

 

बाबरच्या संथ खेळावर टीका 

T20 खेळाच्या जलदगती स्वरूपामुळे बाबरच्या संथ खेळावर बराच वेळ टीका झाली आहे. मात्र, त्याचं पाकिस्तान क्रिकेटमधील महत्त्व अजूनही कायम आहे. दरम्यान, PSL 2025 ला काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं, पण आता स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे आणि अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाईल. 

Read More