Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Pakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचताच झाला 'इज्जतीचा फालुदा', पाहा नेमकं प्रकरण काय?

Australia vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू ऑस्ट्रेलियात आल्यावर त्यांनी स्वत: हाताने आपलं सामान भरलं. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कोणतेही (No officials welcome for Pakistani players) अधिकारी उपस्थित नव्हते.

Pakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचताच झाला 'इज्जतीचा फालुदा', पाहा नेमकं प्रकरण काय?

No officials welcome for Pakistani players : वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामन्यांच्या (Australia vs Pakistan Test) मालिकेसाठी दाखल झाला आहे. बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर नवीन कर्णधार शान मसूदच्या (Shan Masood) नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरेल. 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तान पूर्ण तयारीनिशा ऑस्ट्रेलियाविरुद्ध उतरेल, असं पीसीबीकडून (PCB) सांगण्यात आलंय. अशातच आता कांगारूंच्या धरतीवर उतरताच पाकिस्तानी खेळाडू कुली झाल्याचं पहायला मिळालंय. एवढंच नाही तर खेळाडूंच्या स्वागतासाठी कोणतेही अधिकारी उपलब्ध नसल्याचं पहायला मिळतंय.

पाकिस्तानी खेळाडू ऑस्ट्रेलियात आल्यावर त्यांनी स्वत: हाताने आपलं सामान (Pakistani players loaded their luggage) भरलं. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कोणतेही अधिकारी (No officials welcome) उपस्थित नव्हते. मोहम्मद रिझवानसह खेळाडू स्वतःचे सामान लोड करताना दाखविणाऱ्या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना शिंगावर घेतलंय. याला खरी गरिबी म्हणत भारतीयांनी पाकिस्तानला डिवचलंय. तर बाबर अँड कंपनीच्या इज्जतीचा फालुदा झालाय, असं काही युझर्सने म्हटलं आहे.

पाहा Video

कसा असेल पाकिस्तानचा संघ?

शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद,  मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी. 

पाहा वेळापत्रक 

पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
दुसरा सामना - २६ ते ३०  डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) 

Read More