Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Shimron Hetmyer ने सांगितलं राजस्थानच्या विजयाचं गुपित

Shimron Hetmyer ने थोपटली टीममधील या खेळाडूची पाठ, कौतुकाचा वर्षाव

Shimron Hetmyer ने सांगितलं राजस्थानच्या विजयाचं गुपित

मुंबई : राजस्थान टीमने पंजाबचा 6 विकेट्सने पराभव केला. राजस्थानकडून फलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. राजस्थान प्लेऑफच्या दिशेनं पाऊल उचलत आहे.

या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज ओपनर शिमरॉन हेटमायरने मोठे विधान केलं. राजस्थानच्या विजयामागचं त्याने रहस्य सांगितलं आहे. 

190 धावांचे मोठे लक्ष्य गाठणं सोपं नव्हतं मात्र फलंदाजांनी मिळून ही कामगिरी केली. यावरून आमच्या फलंदाजीमधली ताकद समजली. सर्व खेळाडूंवर खूप विश्वास आहे. टीममध्ये विश्वास आणि जिद्दीमुळे हे शक्य झाल्याचं वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर म्हणाला.

शिमरॉच्या म्हणण्यानुसार लक्ष्याचा पाठलाग करताना जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही खेळण्याचा प्रयत्न करत होतो. हेटमायरने 20 वर्षांच्या युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालचेही कौतुक केले. 

जयस्वालने तुफानी खेळी केली त्याचा फायदा टीमला झाला. त्याला धावा करताना पाहून मला खूप आनंद झाला. मी काही काळामध्ये पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ती एक होती. मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. 

जोस बटलरने राजस्थान रॉयल्सला खडबडीत खेळपट्टीवर 16 चेंडूत 30 धावा करून झंझावाती सुरुवात करून दिली, त्यानंतर सहकारी सलामीवीर यशस्वी जैस्वालने 41 चेंडूत 68 धावा करत संघाला दोन चेंडू शिल्लक ठेवले होते. सहा विकेट्सने थेट विजय मिळवला. 

Read More