Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

2015 मध्ये IPL खेळलेला 'हा' स्टार खेळाडू बनला पाकिस्तानचा हेड कोच, PCB ने केली घोषणा

पाकिस्तानचा हा माजी क्रिकेटर आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळण्यावर बंदी लावण्यात आलेली असताना सुद्धा आयपीएल 2015 मध्ये खेळलेला होता. 

2015 मध्ये IPL खेळलेला 'हा' स्टार खेळाडू बनला पाकिस्तानचा हेड कोच, PCB ने केली घोषणा

Pakistan Head Coach : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने WTC 2025-27 च्या सायकलसाठी एक मोठा बदल केला आहे. बोर्डाने माजी क्रिकेटर अजहर महमूद याला पाकिस्तानच्या टेस्ट क्रिकेट संघाचा कार्यवाहक मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमलं आहे. राष्ट्रीय संघात सहाय्यक मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केल्यावर अजहरने खूपकाळ संघाची रणनीती ठरवण्यात योगदान दिलं. पाकिस्तानचा हा माजी क्रिकेटर आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळण्यावर बंदी लावण्यात आलेली असताना सुद्धा आयपीएल 2015 मध्ये खेळलेला होता. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विश्वास आहे की अजहर महमूद पाकिस्तान टेस्ट संघाला एका उंचीवर नेईल, आणि त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या सायकलमध्ये पाकिस्तान टेस्ट संघ चांगली कामगिरी करेल. काउंटी चॅम्पिअनशिपमध्ये अजहर महमूदचा रेकॉर्ड चांगला असून त्याच्या नेतृत्वातील संघानं दोन खिताब जिंकले. त्याची मुलगी स्वतः इंग्लंड क्लब क्रिकेटकडून खेळते. 

कोण आहे अजहर महमूद?

50 वर्षीय अजहर महमूद हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आहे. त्याने टेस्ट करिअर 4 तर वनडे करिअर 11 वर्षांचं राहिलं आहे. महमूद ने 2003 मध्ये एबा कुरैशी सोबत विवाह केला. जिच्याशी तिची भेट 1999 वर्ल्ड कप दरम्यान झाली होती. अजहर महमूदची पत्नी एबा कुरैशी ब्रिटिश नागरिक असून तिला 3 मुलं आहेत. मुलगी स्वतः इंग्लंड क्लब क्रिकेटकडून खेळते. अजहरने स्वतः आपल्या मुलीला ट्रेनिंग दिलीये. 

हेही वाचा : हॅपी रिटायरमेंट जड्डू भाई ...ऋषभ पंत ने रवींद्र जडेजाला दिल्या निवृत्तीच्या शुभेच्छा, Video Viral

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

IPL 2015 मध्ये कसा खेळला होता अजहर महमूद?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर असलेला अजहर महमूदने 2003 मध्ये ब्रिटिश नागरिकता असलेल्या महिलेशी लग्न केलं होतं. 2011 मध्ये  स्वतः ब्रिटिश अजहरला सुद्धा ब्रिटिश नागरिकत्व मिळाले, त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बंदी असूनही तो आयपीएलमध्ये खेळू शकला. अझहर 2015 मध्ये केकेआर संघाकडून आयपीएलमध्ये खेळला. 2012 आणि 2013 मध्ये तो पंजाबकडून खेळला होता. 

Read More