Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

PHOTO ...असा दिसतो सानिया- शोएबचा इझहान

 आई- मुलाची ही जोडी नेटकऱ्यांच्या पसंतीस

PHOTO  ...असा दिसतो सानिया- शोएबचा इझहान

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या काही खास गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. या माध्यमातून जणून चाहते आणि सेलिब्रिटींमध्ये असणारं नातं आणखी दृढ होत आहे. याचच सुरेख उदाहरण नुकतच पाहायला मिळालं. टेनिसपटू सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर आपल्या मुलासोबतचा गोड फोटो शेअर करत त्याला एका अर्थी सर्वांच्याच भेटीला आणलं आहे. 

काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि तिचा पती, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची आनंदाची बातमी दिली होती. पुढे काही दिवसांनी त्यांनी आपल्या मुलाचं नावही सर्वांना सांगितलं. ज्यानंतर आता थेट आपल्या मुलालाच सानिया सर्वांच्या भेटीला घेऊन आली आहे. 

साजेशा कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये सानियाने मोठ्या प्रेमाने तिच्या मुलाला म्हणजेच इझहानला जवळ घेतल्याचं दिसत आहे. तोही कॅमेऱ्याकडे एकटक पाहतो आहे. आई- मुलाची ही जोडी नेटकऱ्यांच्या पसंतीस आली असून, कमेंट बॉक्समध्येही इझहानचं अनेकांनीट कौतुक करत सोशल मीडियाच्या या वर्तुळात त्याचं स्वागत केलं आहे. सानियाने यापूर्वीही त्याचे काही सुरेख फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

 इझहानच्या जन्माआधीपासूनच सानिया टेनिस विश्वापासून दूर होती. त्यामुळे आता येत्या काळात ती या खेळात पुनरागमन करणार का, हा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केला होता. तेव्हा ती पुन्हा टेनिस कोर्टवर येत दणक्यात पुनरागमन करणार हे पाहणंही तितकच औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Read More