Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

फोटो : साक्षी धोनी या अंदाजात दिसली 'माही'च्या बेस्ट फ्रेंडसोबत

क्रिकेटच्या बाहेर जाऊनही त्यांची मैत्री आहे. दोघांचे पारिवारीक घनिष्ठ संबंध आहेत. 

फोटो :  साक्षी धोनी या अंदाजात दिसली 'माही'च्या बेस्ट फ्रेंडसोबत

नवी दिल्ली : दोन वर्षांच्या बंदीनंतर परतलेल्या चेन्नईच्या टीमने 'आयपीएल २०१८' मध्ये शानदार सुरूवात केलीय. चार मॅचपैकी ३ मॅच त्यांनी जिंकल्याने त्यांचे चाहतेही खुश आहेत. त्यांचा स्टार फलंदाज सुरेश रैनादेखील चांगल्या फॉर्मात आहे. त्याचा फॉर्म जातोय अस वाटत असतानाच ४६ रन्सची शानदार खेळी त्याने केली. शेन वॉटसनसोबत त्याने मोठी भागीदारी केली. सध्या सुरेश रैना सोशल मीडियावर जास्त व्यक्त होत असतो. नुकताच त्याने महेंद्रेसिंग धोनीच्या पत्नीसोबतचा एक फोटो शेयर केलाय. त्याला 'ट्रॅव्हल डे' असे कॅप्शन दिले. रैनाचे धोनीसोबत स्पेशल बॉंडींग आहे. ते दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. २००५ पासून ते एकत्र खेळतायत. टीम इंडियासाठी खेळताना दोघांनी अनेकदा शतकी भागीदारी केली आहे. पण क्रिकेटच्या बाहेर जाऊनही त्यांची मैत्री आहे. दोघांचे पारिवारीक घनिष्ठ संबंध आहेत.

रैनाला सर्वात आधी कॉल 

 

Travel day 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

माहीची मुलगी जीवाच्या जन्मानंतर साक्षी धोनीने रैनाला सर्वात आधी कॉल केला होता. २०१५ मध्ये टीम इंडिया वर्ल्डकपसाठी विदेशी होती. दरम्यान ६ जानेवारीला जीवाचा जन्म झाला. प्रॅक्टीसमध्ये व्यत्यय नको म्हणून धोनीने फोन जवळ ठेवला नव्हता. अशावेळी रैनाला कॉल करुन ही आनंदाची बातमी देत ही बातमी धोनीला सांगण्यास सांगितली. 

Read More