बुधवारी, २७ मार्च रोजी आयपीएल (IPL 2025) मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण या सामन्यातही त्याचे फलंदाज उत्तम खेळी दाखवू शकले नाहीत. यावेळी अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हेसुद्धा लवकर परतले. तर ट्रॅव्हिस हेडने २८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर मोठी धावसंख्या गाठण्याची जबाबदारी हेन्रिक क्लासेनवर आली, मात्र त्याचीही विकेट पडली. विचित्र पद्धतीने धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
बाराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, लखनौचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने ऑफ स्टंपच्या बाहेर कमी फुल-टॉस टाकला. यावर नितीश रेड्डी यांनी जोरदार फटकेबाजी केली. तयावेळी त्याचा बॉल प्रिन्सच्या दिशेने गेला. फटका इतका जोरदार होता की त्याला चेंडू पकडता आला नाही आणि तो थेट स्टंपवर गेला. यावेळी क्लासेन धावण्यासाठी क्रीजबाहेर उभा होता आणि काही क्षणातच तो धावबाद झाला. अशाप्रकारे, ज्या चेंडूवर रेड्डीला बाद होण्याची संधी होती त्या चेंडूवर क्लासेन दुर्दैवाने त्याची विकेट गमावली.
चेंडू प्रिन्स यादव यांच्या दिशेने जोरात आला. त्यामुळे हाताला मार लागला आणि तो बॉल नीट पकडूही शकला नाही. तो जखमी झाला. प्रिन्स तिथे पडला आणि वेदनेने ओरडू लागला. झेल सुटल्यानंतर क्लासेन बाद झाल्याने तो आंनदी असला तरी तो फारसा साजरा करू शकला नाही.
Heinrich Klaasen’s dismissal had the commentary box buzzing! Unlucky, but it’s all part of the game. #IPLonJioStar #SRHvLSG | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports Hindi & JioHotstar! pic.twitter.com/j3QJ8caXxO
— Star Sports (@StarSportsIndia) March 27, 2025
हेन्रिक क्लासेन बाद झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा डाव रुळावरून घसरला. नितीश रेड्डीही बाद झाल्यानंतर 2 षटके निघून गेला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. शेवटी हैदराबाद संघाने झटपट विकेट गमावल्या. याचा परिणाम असा झाला की, गेल्या सामन्यात 286 धावा करणारा संघ यावेळी केवळ 190 धावांवरच थांबला.