Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

CSK मध्ये ऋतुराजच्या जागेवर खेळणार मुंबईचा खेळाडू? IPL ऑक्शनमध्ये राहिलेला Unsold

दुष्काळात तेरावा महिना म्हणजे चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापतीच्या कारणामुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीकडे सीएसकेचं नेतृत्व आहे

CSK मध्ये ऋतुराजच्या जागेवर खेळणार मुंबईचा खेळाडू? IPL ऑक्शनमध्ये राहिलेला Unsold

IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात तब्बल 5 वेळा विजेतेपदावर नाव कोरलेला चेन्नई सुपरकिंग्सचा संघ यंदा आयपीएल 2025 मध्ये सलग 5 वेळा पराभूत झालेला आहे. सध्या संघ संकटात असून दुष्काळात तेरावा महिना म्हणजे चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा दुखापतीच्या कारणामुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीकडे (MS Dhoni) सीएसकेचं नेतृत्व आहे. अशातच ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट कोणता खेळाडू असणार याची जोरदार चर्चा सुरु आहे यातील एक नाव हे मुंबईच्या स्टार खेळाडूंचं सुद्धा आहे. 

ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त : 

चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की ऋतुराज गायकवाडला गुवाहाटीमध्ये दुखापत झाली होती. तो दुखापतीसह खेळत होता. आम्ही त्याचा एक्स-रे काढला, परंतु त्यात सगळं स्पष्ट झालं नाही. मग आम्ही एमआरआय सुद्धा काढला आणि ज्यात समजलं की त्याच्या कोपऱ्यात फ्रॅक्चर आहे. आम्ही खूप निराश झालो, पण त्याने संघासाठी जे प्रयत्न केले त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. आता तो या दुखापतीमुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर होत आहे. आमच्याकडे अनकॅप्ड खेळाडू म्हणून एम एस धोनी आहे जो आयपीएल 2025 मध्ये उर्वरित सामन्यात संघाचं नेतृत्व करेल. 

हेही वाचा : 'अरे मला विचार ना', भर मैदानात श्रेयस अय्यर अंपायरवर भडकला, लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

आयपीएलमध्ये अनसोल्ड खेळाडूला मिळणार संधी? 

पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. यावर्षी त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. पृथ्वीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश विरुद्ध मुंबईकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. तसेच नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये पृथ्वी शॉला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. त्यामुळे तो अनसोल्ड राहिला. मात्र आता ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्याने पृथ्वीला सीएसकेकडून संधी मिळू शकते. या संदर्भात काही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत असून यात पृथ्वी शॉ आयपीएल 2025 सुरु असताना ऋतुराजच्या ऐवजी चेन्नई सुपरकिंग्सचा भाग होऊ शकतो असे म्हटले जात आहे. पृथ्वी शॉ यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळलाय. मात्र अद्याप ऋतुराज गायकवाडच्या रिप्लेसमेंटबाबत कोणतीही अधिकृत माहिती सीएसकेने दिलेली नाही. 

CSK च्या बॅटिंग लाईनअपला झटका : 

ऋतुराज गायकवाड हा कर्णधार असण्यासोबतच सीएसकेचा स्टार फलंदाज सुद्धा होता. मात्र 30 मार्च रोजी राजस्थान विरुद्ध सामन्यात त्याला दुखापत झाली. तुषार देशपांडेने टाकलेला एक बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथपेक्षा जास्त उसळला आणि ऋतुराजच्या डाव्या हाताला लागला. 5 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात ऋतुराज खेळणार की नाही याबाबत संशय होता, परंतु त्याने सामना खेळला, तसेच त्यानंतर मंगळवारी पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात सुद्धा त्याने फलंदाजी केली. आता ऋतुराज स्पर्धेतून बाहेर झाल्याने चेन्नई सुपरकिंग्सची बॅटिंग लाईनअप कमजोर होऊ शकते. आता सीएसकेला त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करावा लागेल

Read More