Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रिंकू सिंहने अंगठी घालताच भावुक झाली प्रिया सरोज, डोळ्यातून वाहिले आनंदाश्रू, पाहा Inside Videos

Rinku Singh Engagment : दोघांच्या नात्याची मागील काही दिवसांपासून चर्चा होती, आयपीएल 2025 नंतर क्रिकेटर रिंकू सिंहने प्रिया सरोज सोबत साखरपुडा केला. या कार्यक्रमाला राजकीय तसेच क्रीडा विश्वातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 

रिंकू सिंहने अंगठी घालताच भावुक झाली प्रिया सरोज, डोळ्यातून वाहिले आनंदाश्रू, पाहा Inside Videos

Rinku Singh Engagment : भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Rinku Singh And Priya Saroj) यांचा साखरपुडा सोहळा रविवार 8 जून रोजी पार पडला. दोघांच्या नात्याची मागील काही दिवसांपासून चर्चा होती, आयपीएल 2025 नंतर क्रिकेटर रिंकू सिंहने प्रिया सरोज सोबत साखरपुडा केला. या कार्यक्रमाला राजकीय तसेच क्रीडा विश्वातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यातील एका व्हिडिओत साखरपुडा (Engagment Ceremony) झाल्यानंतर प्रिया सरोजला अश्रू अनावर झाल्याचं दिसतं आहे. 

भावुक झाली प्रिया सरोज : 

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या नात्याची चर्चा जानेवारी महिन्यापासूनच सुरु होती. दोघे लवकरच विवाह करणार असून त्यांच्या नात्याला दोघांच्या कुटुंबाकडून सुद्धा संमती असल्याचे समोर आले होते. 8 जून रोजी लखनऊच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये  रिंकू आणि सरोज यांचा साखरपुडा संपन्न झाला असून यावेळी रिंकूने प्रियाच्या बोटात अंगठी घालताच तिला आनंदाश्रू अनावर झाले. सध्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

पाहा व्हिडीओ : 

दिग्गजांनी लावली हजेरी : 

रिंकू सिंह आणि  प्रिया सरोजच्या या खास सोहळ्याला बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. साखरपुड्याला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि पक्षाचे तब्बल 25 खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक VVIP पाहुणेही या समारंभाला उपस्थित होते. समोर आलेल्या माहितीनुसार, रिंकू आणि प्रिया यांचे लग्न नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहे.

हेही वाचा : 'कानशिलात मारायला हवी होती...' श्रेयस अय्यर सोबतच्या वादावर शशांक सिंहने सोडलं मौन, चूक कोणाची होती?

 

कोण आहे प्रिया सरोज : 

प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मच्छलीशहरमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या. या विजयामुळे त्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या दुसऱ्या सर्वात तरुण उमेदवार ठरल्या. तुफानी सरोज या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, या कनेक्शनमुळेच अखिलेश यादव यांनी प्रिया सरोज यांना तिकीट देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार असण्यासोबतच सुप्रीम कोर्टात वकील असून प्रॅक्टिसही करतात. प्रिया सरोज कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असायची. दिल्ली विद्यापीठातून बीए आणि नोएडा येथील एमिटी विद्यापीठातून एलएलबीची पदवी प्राप्त केली आहे. 

रिंकू सिंहची कारकीर्द : 

रिंकू सिंहने आयपीएलमध्ये 58 सामने खेळले असून यात 1099 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 अर्धशतक केली आहेत. तर टी 20 मध्ये सुद्धा भारतीय संघाकडून त्याच पदार्पण झालं असून त्यानं 546 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 अर्धशतक ठोकली यासह 2 विकेट सुद्धा घेतले. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने 2 सामन्यात त्याने 55 धावा केल्या असून 1 विकेट सुद्धा घेतली आहे. 

Read More