Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वरळी डोममध्ये होणार प्रो गोविंदा सीझन 3 चा थरारक महामुकाबला! ख्रिस गेल असणार ब्रँड ॲम्बेसेडर

Pro Govinda Season 3: वरळी डोम येथे प्रो गोविंदा सीझन 3 चा अंतिम सामना रंगणार असून प्रो गोविंदा सीझन 3 चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू ख्रिस गेल आहे. 

वरळी डोममध्ये होणार प्रो गोविंदा सीझन 3 चा थरारक महामुकाबला! ख्रिस गेल असणार ब्रँड ॲम्बेसेडर

Chris Gayle Pro Govinda Season 3 brand ambassador: पारंपरिक दहीहंडीला व्यावसायिक रंग देणाऱ्या प्रो गोविंदा लीग सीझन 3 चा अंतिम टप्पा 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान वरळी डोममध्ये पार पडणार आहे. यंदाच्या सत्रात संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील दमदार गोविंदा पथकं भिडणार असून, प्रेक्षकांना थरार, कौशल्य आणि साहसाने भरलेली दहीहंडीची सर्वोच्च स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

ब्रॅण्ड ॲम्बेसेडर प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू ख्रिस गेल

या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा जगप्रसिद्ध वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल याला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडण्यात आलं आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या पारंपरिक खेळाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कोटींची बक्षिसं, मोठा थरार

यंदाच्या हंगामात एकूण 1.5 कोटी रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 75 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 50 लाख, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 25 लाखांचं पारितोषिक असणार आहे. विशेष म्हणजे, उर्वरित सर्व सहभागी संघांनाही प्रत्येकी 3 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलं जाणार आहे.

खेलातून करिअरकडे वाटचाल

प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले, “ही स्पर्धा आता केवळ सणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती एक व्यावसायिक आणि साहसी खेळाची ओळख बनली आहे. यामध्ये ताकद, शिस्त आणि टीमवर्कची खरी कसोटी लागते. ख्रिस गेलसारख्या दिग्गजाची साथ लाभल्यामुळे ही लीग जगभर पोहचण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागलं आहे.”

'या' संघांमध्ये होणार अंतिम टक्कर

  • नागपूर निजान्स
  • अलिबाग नाईट्स
  • शूर मुंबईकर
  • ठाणे टायगर्स
  • मिरा भाईंदर लायन्स
  • नाशिक रेंजर्स
  • दिल्ली इगल्स
  • सुरत टायटन्स
  • जयपूर किंग्स
  • बंगळुरू ब्लेझर्स
  • हैदराबाद डायनामोज
  • गोवा सर्फर्स
  • वाराणसी महादेव असेंडर्स
  • लखनऊ पँथर्स
  • नवी मुंबई स्ट्रायकर्स

या स्पर्धेमुळे गोविंदा पथकांतील तरुणांना खेळाच्या माध्यमातून करिअरची नवी दिशा मिळत असून, महाराष्ट्राचा पारंपरिक वारसा नव्या पिढीकडे अधिक भक्कमपणे पोहचतो आहे.

Read More