Pro Kabaddi League 2025: प्रो कबड्डी लीगचा (PKL) बारावा सीजन प्रेक्षांचे मनोरंजन करायला लवकरच येणार आहे. हा सीजन अधिक थरारक होणार आहे, आणि त्याच्या तयारीला सुरुवात होत आहे. मशल स्पोर्ट्सने घोषणा केली आहे की, 31 मे आणि 1 जून रोजी मुंबईत खेळाडूंचा लिलाव अर्थात खेळाडूंचे ऑक्श आयोजित केला जाणार आहे. सीझन 11 मध्ये हरयाणा स्टीलर्सने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. 29 डिसेंबर 2024 रोजी अंतिम सामन्यात तीन वेळा विजेत्या पटना पायरेट्सला हरवून हरियाणा स्टीलर्सने पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली होती. आता सर्वांच्या नजरा आगामी लिलावाकडे लागलेल्या आहेत.
सीझन 11 च्या यशस्वी आयोजनानंतर, आता प्रो कबड्डी लीग ही आणखी एका नव्या अध्यायाकडे वाटचाल करत आहे. या ऑक्शनमध्ये सर्व संघ त्यांच्या रणनीतीनुसार खेळाडूंना खरेदी करून आपली टीम मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.
मशल स्पोर्ट्सचे बिझनेस हेड आणि प्रो कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी सांगितले की, “PKL चा खेळाडू ऑक्शन हे प्रत्येक हंगामाच्या तयारीचा महत्त्वाचा टप्पा आहे. ही प्रक्रिया संघांसाठी त्यांच्या रणनीती, उत्साह आणि विजेतेपदाच्या महत्त्वाकडे दर्शवणारी असते. यामुळे भारताच्या पारंपरिक खेळात जागतिक पातळीवरूनही प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते.”
2014 पासून सुरू झालेली प्रो कबड्डी लीग आज देशातील सर्वात मोठ्या क्रीडा लीग्सपैकी एक मानली जाते. आतापर्यंत 8 वेगवेगळ्या संघांनी विजेतेपद जिंकले आहे. ही लीग भारतीय कबड्डीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारी एक मजबूत व्यासपीठ बनलं आहे. JioStar आणि Mashal Sports यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही लीग भारतीय क्रीडा विश्वात मानाचं स्थान मिळवत आहे.
या वर्षीचा खेळाडू लिलाव भारतीय हौशी कबड्डी महासंघ (AKFI) च्या देखरेखीखाली होणार आहे. हे ऑक्शन लाईव्ह बघण्यासाठी www.prokabaddi.com या वेबसाईट किंवा प्रो कबड्डीचा अधिकृत अॅप डाऊनलोड करा. इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरवर ऑक्शनची सर्व माहिती आणि अपडेट्स मिळतील.