Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'या' दिवसापासून सुरु होणार कबड्डीचा थरार! PKL SEASON 12 च्या तारखा जाहीर

Pro Kabaddi League 2025 Dates:  प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामासाठी झालेल्या लिलावानंतर तारखांची वाट बघितली जात होती. आता अखेरीस नवीन सिजनच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.   

'या' दिवसापासून सुरु होणार कबड्डीचा थरार! PKL SEASON 12 च्या तारखा जाहीर

When is Pro Kabbdi League 2025 is Starting: भारतातील सर्वात लोकप्रिय लीगपैकी एक असलेल्या प्रो कबड्डी लीग (PKL) चा 12वा हंगाम येत्या 29 ऑगस्टपासून रंगणार आहे. पीकेएलचे आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी आज ही अधिकृत घोषणा केली. गेल्या 11 हंगामांमध्ये प्रेक्षकांच्या प्रेमात उतरलेली ही लीग आता आणखी एक नवा अध्याय सुरू करत आहे. गतवर्षी पहिल्यांदाच विजेतेपद पटकावणारी हरियाणा स्टीलर्स टीम यंदा आपले जेतेपद वाचवण्यासाठी सज्ज झाली आहे.

1 कोटींहून अधिक रकमेची बोली 

31 मे आणि 1 जून रोजी मुंबईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात, दहा खेळाडूंना 1 कोटींहून अधिक रकमेची बोली मिळाली.  जे लीगच्या इतिहासात एक मोठं पाऊल मानलं जात आहे. यामुळे हंगामात सामना अधिक तगडा आणि थरारक होणार, याबाबत शंका नाही. पीकेएलचे लीग कमिश्नर अनुपम गोस्वामी यांनी सांगितले, “सीझन 12 ची सुरुवात जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. यंदाच्या लिलावाने सगळे विक्रम मोडलेत. त्यामुळे हंगाम अधिक स्पर्धात्मक होणार आहे. चाहत्यांना बड्डी अ‍ॅक्शनचा जबरदस्त अनुभव देण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत.”

हे ही वाचा: आयपीएलप्रमाणे PKL 2025 लिलावात कोटींचा पाऊस! 'हे' आहेत पहिल्या दिवसाचे टॉप 5 महागडे खेळाडू

 

स्थळांची माहिती लवकरच

सध्या फक्त सुरुवातीची तारीख जाहीर करण्यात आली असून, मॅचेस कुठे होतील यासंबंधीची माहिती लवकरच देण्यात येणार आहे. दरम्यान, सर्व 12 संघांनी आपली रचना मजबूत केली असून प्रत्येक संघ विजेतेपदासाठी झुंज देण्यास सिद्ध आहे.

हे ही वाचा: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान आली दुःखद बातमी, आणखी एका दिग्गजाचे अवघ्या 41 वर्षी निधन...

 

पारंपरिक खेळ कबड्डीला जागतिक व्यासपीठ

अ‍ॅमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल स्पोर्ट्स आणि जिओस्टार यांनी मिळून पीकेएलला भारतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी लीग्समध्ये स्थान मिळवून दिलं आहे. भारतीय पारंपरिक खेळ कबड्डीला जागतिक व्यासपीठावर नेण्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात या लीगला जातं. या मंचावरून अनेक नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकता आलं आहे.

हे ही वाचा: एकेकाळी सलमानच्या अभिनेत्रीला डेट करत होता गांगुली! लग्न मोडायलाही होता तयार, जाणून घ्या अधुऱ्या प्रेमकहाणीबद्दल

 

थेट प्रसारण आणि अपडेट्स कुठे मिळवायचे?

प्रो कबड्डी लीग सीझन 12 चे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर आणि जिओ सिनेमा (JioCinema) वर पाहता येणार आहे. लीगशी संबंधित सर्व अपडेट्ससाठी  www.prokabaddi.com भेट द्या. 

Read More