नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात नवनवे रेकॉर्ड्स होत असल्याचं तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
पाकिस्तान सुपर लीग (PSL)मध्ये १ मार्च रोजी पेशावर जालमी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स या टीम्समध्ये मॅच झाली. ही मॅच पेशावरने ५ विकेट्सने जिंकली.
या मॅच दरम्यान एक विचित्र प्रकार घडल्याचं पहायला मिळालं. कारण, एका बॅट्समनने सिक्स मारल्यानंतरही त्याला आऊट देण्यात आलं आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
झालं असं की, क्वेटाच्या टीमने १९ ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत १३५ रन्स बनवले होते. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी वहाब रियाज आला आणि समोर बॅटिंगसाठी होता अनवर अली. रियाजने टाकलेल्या बॉलवर अनवरने जोरदार फटका लगावत सिक्सर मारला. त्यामुळे प्रेक्षकही सेलिब्रेट करायला लागले मात्र, त्याचवेळेस विकेटकीपरने स्टंप्सकडे इशारा केला.
अनवरने मागे वळून पाहिलं तर एक बेल्स जमिनीवर पडली होती. बॅट्समन आणि प्लेअर्सलाही कळलं नाही की नेमकं झालं तरी काय? त्यामुळे अंपायरने थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला.
ICYMI: OUT! 19.1 Wahab Riaz to Anwar Ali
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 1, 2018
Watch ball by ball highlights at https://t.co/OhOiaZDLRV#QGvPZ #HBLPSL #Cricingif #PSL2018 pic.twitter.com/j7lsKOHRsK
थर्ड अंपायरने पाहिलं असता व्हिडिओ फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सिक्सर लगावताना अनवरचा पाय स्टंम्पला लागला आणि बेल्स खाली पडली. यानंतर अनवरला आऊट देण्यात आलं. त्यामुळे क्वेटाच्या टीममध्ये असलेला आनंद, जल्लोष एका क्षणात शांत झाला.