Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तान प्रीमियर लीगचे सर्व सामने फिक्स? 6 सामन्यांचा पॅटर्न एकच... नक्की काय घडलं?

PSL 2025 : आतापर्यंत PSL 2025 चे सर्व 9 सामने रावळपिंडी किंवा कराचीमध्ये खेळले गेले आहेत.

पाकिस्तान प्रीमियर लीगचे सर्व सामने फिक्स? 6 सामन्यांचा पॅटर्न एकच... नक्की काय घडलं?

PSL 2025 : जगभरातील क्रिकेटविश्वात सध्या आयपीएल 2025 ची धामधूम सुरु आहे. यंदा आयपीएलचा 18 वा हंगाम कोण जिंकणार? याबद्दल फॅन्सच्या मनात उत्सुकता आहे. दुसरीकडे भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रिमियर लीग खेळवली जातेय. दोन्ही स्पर्धा एकाच वेळात होत असल्याने त्यांची तुलना केली जातेय. पण आता पीएसएलमध्ये एक मोठा घोटाळा समोर आलाय. 

भारतात आयपीएल 2025 चा उत्साह शिगेला पोहोचलाय. दरवेळेस मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग अशा टिम्सचा बोलबाला असतो. पण यावेळी दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या टीम्सने  धुमाकूळ घातला आहे. दुसरीकडे पीएसएल 2025 भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये एका विचित्र कारणामुळे चर्चेत आले आहे. इस्लामाबाद युनायटेड सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये वर्चस्व गाजवतंय. या टीमने सर्वाधिक 3 सामने जिंकले आहेत. आतापर्यंत लीगमध्ये एकूण 9 सामने खेळले गेले आहेत. पण त्यापैकी शेवटच्या 6 सामन्यांमध्ये हाच निकाल लागला. यामुळे पीएसएल 2025 मध्ये काही घोटाळा सुरू आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे.

पीएसएल 2025 घोटाळ्यात फसवणूक?

पीएसएल 2025 च्या पहिल्या 3 सामन्यांची जास्त चर्चा झाली. यामागे कारणही तसेच होते. कारण धावसंख्येचा पाठलाग करणारी टीम दोनवेळा विजयी झाली. तर गेल्या 6 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमने प्रत्येकवेळी विजय मिळवलाय.  पीएसएल 2025 मध्ये पाठलाग करणाऱ्या टीमसाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. या 6 सामन्यांमध्ये असे दोन विजय होते ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 100 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने विजय मिळवला. यामुळे सर्वजण आश्चर्याने याकडे पाहत होते. 

या गेल्या 6 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमने 5 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या. दुसरीकडे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांची स्थिती इतकी वाईट होती की गेल्या 6 सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या टीमची सर्वोच्च धावसंख्या फक्त 155 धावांचा होता. जो मुलतान सुलतानने इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध केला.

टॉस जिंकणारी टीम जिंकते मॅच

आतापर्यंत PSL 2025 चे सर्व 9 सामने रावळपिंडी किंवा कराचीमध्ये खेळले गेले आहेत. यापैकी टॉर्च हरणारी टीम विजयी झाली, असे  फक्त दोनदाच असे घडले आहे. पीएसएल 2025 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये टॉर्च जिंकणाऱ्या टीमने 7 वेळा विजय मिळवला. पेशावर झल्मीने पाकिस्तान सुपर लीगमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रमही मोडला. गेल्या शनिवारी पेशावरने मुलतान सुलतानचा 120 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

Read More