PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीग 2025 (PSL 2025) या स्पर्धेची फायनल 25 मे रोजी पार पडली असून यंदा लाहोर कलंदर्स या संघाने पाकिस्तान सुपर लीगचा खिताब पटकावला आहे. शाहीन शाह अफरीदी (Shaheen Shah Afridi) याच्या नेतृत्वात लाहोर संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. मात्र अनेक क्रिकेट चाहत्यांना ही गोष्ट माहिती नाही की, शाहीनच्या एका नातेवाईकाचा दहशतवादाशी संबंध होता, ज्याला भारताच्या BSF जवानांनी गोळी मारून संपवलं होतं.
शाहीन शाह अफरीदीच्या त्या नातेवाईकाबाबत जाणून घेऊयात जो दहशतवादी होता आणि ज्याला, भारताच्या BSF जवानांनी गोळी मारून संपवलं होतं. शाहीन शाह अफरीदीच्या त्या नातेवाईकाचं नाव शाकिब होतं जो पाकिस्तानच्या पेशावरचा राहणारा होता. तो जवळपास दीड वर्ष जम्मू काश्मीर भागातील दहशतवादी ठिकाणांवर ऍक्टिव्ह होता. शाहीन शाह अफरीदीचं दहशतवादी असलेल्या शाकिबशी नातं तेव्हा जोडलं गेलं जेव्हा त्याने माजी क्रिकेटर शाहिद अफरीदीच्या मुलीशी लग्न केलं आणि तो त्याचा जावई झाला. दहशतवादी असलेला शाकिब हा शाहिद आफ्रिदीच्या काकांचा मुलगा होता. नात्याने तो शाहीन शाह अफरीदीचा सासरा लागला असता.
हेही वाचा : गुजरातच्या पराभवामुळे बदललं प्लेऑफचं समीकरण, मुंबई इंडियन्सला टॉपवर पोहोचण्यासाठी गोल्डन चान्स
शाहिद आफ्रिदीचा भाऊ आणि दहशतवादी असलेल्या शाकिबला भारताच्या BSF जवानांनी 7 सप्टेंबर 2003 मध्ये एका चकमकीत ठार केलं होतं. २२ वर्षांपूर्वी अनंतनागमध्ये ही चकमक झाली होती. BSF जवानांनी पळून जात असलेल्या शाकिबला गोळ्या घालून संपवलं होतं. BSF ने दहशतवादी शाकिब हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा नातेवाईक असल्याचे म्हटले होते. तसेच शाकिबला हरकत-उल-अंसारच्या बटालियनचं कमांडर म्हणून घोषित करण्यात आलं होतं.