IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये जवळपास तीन संघांनी त्यांचं प्लेऑफमधील स्थान नक्की केलं आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना जिंकून श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात पंजाब किंग्सने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं आहे. श्रेयस अय्यर मागच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वात संघानं आयपीएल 2024 चे विजेतेपद सुद्धा जिंकले. अशातच आता श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये एक मोठी कामगिरी केली असून इतिहास रचला आहे.
पंजाब किंग्सने आयपीएल 2025 मधील 8 वा सामना जिंकला यासह त्यांनी प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने 219 धावा केल्या. परंतु राजस्थान विजयासाठी आवश्यक स्कोअर करू शकली नाही आणि 209 धावा करून बाद झाली. 10 धावांनी पंजाब किंग्सने विजय मिळवला. पंजाब सह गुजरात आणि बंगळुरू हे संघ सुद्धा प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाले.
यासह श्रेयस अय्यरने सुद्धा आयपीएलमध्ये इतिहास रचला असून तो आयपीएलमधील असा पहिला कर्णधार आहे ज्याने त्याच्या नेतृत्वात तीन वेगवेगळ्या संघांना प्लेऑफमध्ये पोहोचवले. मागच्या वर्षी त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद जिंकले होते. श्रेयस अय्यर यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा सुद्धा कर्णधार होता. 2019 आणि 2020 या दोन सीजनमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं होतं. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि एम एस धोनी सुद्धा श्रेयस अय्यर सारखी कामगिरी करू शकले नाहीत.
Different jerseys, same leadership
IndianPremierLeague (IPL) May 19, 2025
Will this be the season Shreyas Iyer takes PBKS all the way TATAIPL PunjabKingsIPL ShreyasIyer15 pic.twitter.com/poIirhscGM
हेही वाचा : तेंडुलकर चौक, गावसकर मार्ग, विराट रोड... कुठे आहेत 'या' क्रिकेटर्सच्या नावाचे रस्ते
पंजाब किंग्स हा आयपीएल 2025 मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्या खात्यात 17 पॉईंट्स असून त्याच्या वरती म्हणजेच टॉप 1 ला 18 पॉईंट्स सह गुजरात टायटन्स आणि 17 पॉईंट्स सह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा +0.482 आहे तर पंजाबचा नेट रनरेट हा +0.389 असा आहे. तेव्हा उरलेले दोन सामने जिंकून लीग स्टेज पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर फिनिश करण्याचा प्रयत्न पंजाब किंग्सचा असेल जेणेकरून त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील.