Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025: 'तू मला रोखू शकत नाहीस,' धोनीचा उल्लेख करताच अश्विनने पॅनलिस्टला केलं गप्प; म्हणाला 'CSK च्या...'

IPL 2025: आर अश्विनला (R Ashwin) चर्चेत सहभागी सदस्यांना महेंद्रसिग धोनी किंवा चेन्नईबद्दल बोलू नका अशी आठवण करुन द्यावी लागली.     

IPL 2025: 'तू मला रोखू शकत नाहीस,' धोनीचा उल्लेख करताच अश्विनने पॅनलिस्टला केलं गप्प; म्हणाला 'CSK च्या...'

IPL 2025: भारताचा माजी क्रिकेटर आर अश्विनने (R Ashwin) स्वत:ला क्रिकेटपुरतं मर्यादित ठेवलं नसून, सोशल मीडियावरही सहजपणे वावर करत असतो. आर अश्विन सध्या आयपीएलमध्ये खेळत असून दुसरीकडे युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांशी संवादही साधत आहे. आर अश्विनंचं युट्यूब चॅनेल चांगलंच प्रसिद्ध झालं असून, त्याच्या करिअरला यामुळे आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आर अश्विनचं युट्यूब चॅनेल प्रसिद्ध होण्यामागे त्याचा आयपीएल संघ चेन्नईशी संबंधित झालेले काही वाद कारणीभूत आहेत. यादरम्यान सध्या त्याने एका व्हिडीओत पॅनेलवरील सदस्याला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई (Chennai Super Kings) संघाबद्दल बोलण्यापासून रोखलं. 

"तू सामना जिंकलास याचा मला खूप आनंद आहे. अश्विन, फक्त एकच गोष्ट आहे की तू संघाचं बऱ्याचदा नेतृत्व केलं आहेस. तू ज्या संघाचे नेतृत्व केलं आहेस त्याने टीएनपीएल जिंकली आहे. मला वाटतं की नेतृत्व खूप महत्वाचे आहे. संजू सॅसमन, श्रेयस अय्यर, थाला धोनीसारखं नेतृत्व करणारं कोणीतरी आहे," असं पॅनेलच्या सदस्याने अश्विनला सांगितलं. यावेळी अश्विनला पॅनेल सदस्याय एक छोटीशी आठवण करून द्यावी लागली.

पॅनेल सदस्याचं बोलणं ऐकताच आर अश्विन त्याला, 'शू शू' असं सांगत शांत राहण्यास सांगतो. "नाही, तू यासंदर्भात बोलू शकत नाहीस. मी बोलू शकतो. मी ऑडिअन्स सदस्य आहे," असं सांगत पॅनेल सदस्य स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. यावर चेन्नई संघातून आपल्या आयपीएल करिअरला सुरुवात करणारा आर अश्विन सांगतो की, जेव्हा तो राजस्थाना रॉयल्समध्ये होता तेव्हा त्यांच्याबद्दलही भाष्य केलं होतं. 

"मी कधीही माझा संघ राजस्थान रॉयल्स संदर्भातही बोललेलो नाही," असं सांगत अश्विनने हे फक्त चेन्नईच्या वादासंदर्भात नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. 

अश्विनच्या युट्यूब अकाउंटवरून वाद सुरू झाला जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (RCB) माजी विश्लेषक प्रसन्ना अगोरम यांनी रवींद्र जडेजा आणि अश्विनसारखे खेळाडू असतानाही अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमदला संघात समाविष्ट करण्याच्या सीएसकेच्या निर्णयावर आक्षेप घेतला. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनाही या वादावर त्यांचे मत विचारण्यात आले. "मला काहीच माहिती नाही. हे त्याचं चॅनेल असल्याचं मला माहिती नव्हतं. ते अप्रासंगिक आहे," असं फ्लेमिंगने पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. 

पण यावरुन निर्माण झालेला वाद अश्विनला रोखता आला नाही. ज्यामुळे अश्विनने त्याचं चॅनेल आयपीएल 2025 पूर्ण होईपर्यंत सीएसकेचे कोणतेही सामने किंवा कंटेंट कव्हर करणार नाही असं स्पष्ट केलं.

Read More