IPL 2026 : आयपीएल 2025 चा सीजन संपून अवघे काहीच महिने झाले आहेत. मात्र आतापासूनच आयपीएल 2026 ची (IPL 2026) चर्चा जोर धरू लागलीये. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत तब्बल 5 वेळा विजेतेपद पटकावलेला चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये मात्र पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. आता पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सचा (Chennai Superkings) संघ पुन्हा एकदा सज्ज झाला असून त्यांची फ्रेंचायझी इतर संघातील काही स्टार खेळाडूंना आपल्या संघात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसन (Sanju Samson) आणि दिल्ली कॅपिटल्सच्या केएल राहुलचं नाव आघाडीवर आहे. मात्र याची चर्चा असतानाच मीडिया रिपोर्ट्सनुसार चेन्नई सुपरकिंग्समधील एका स्टार खेळाडूला आयपीएल 2026 पूर्वी संघातून बाहेर पडायचं आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार विकेटकिपर संजू सॅमसनला ट्रेड करून किंवा कॅश द्वारे आपल्या संघात घेण्यासाठी सीएसके उत्सुक असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून समोर येताय. मात्र 8 ऑगस्ट रोजी समोर आलेल्या एका मीडिया रिपोर्ट्सनुसार भारताचा माजी गोलंदाज आणि आयपीएल 2025 मध्ये सीएसकेचा भाग असलेला रविचंद्रन अश्विनला सीएसके संघ सोडायचा आहे. त्याने याबाबत फ्रेंचायझीशी सुद्धा संपर्क साधलाय अशी माहिती मिळतेय. यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नसलं तरी अश्विनने सीएसके सोडण्याबाबत आपले मन बनवले आहे आणि याबाबत फ्रँचायझीला सुद्धा कळवले आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीये. आर अश्विनला सीएसकेसाठी मागच्या सीजनमध्ये 9 सामन्यांमध्ये केवळ 7 विकेट घेतल्या होत्या. आर अश्विनला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये सीएसकेने 9.75 कोटींना करारबद्ध केले होते.
हेही वाचा : क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भावा बहिणीच्या 5 जोड्या, एका भारतीय जोडीचाही समावेश
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार विकेटकिपर संजू सॅमसन (Sanju Samson) हा आगामी आयपीएल 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ सोडू इच्छितो. मीडिया रिपोर्ट्समधून 7 ऑगस्टला माहिती समोर आली की संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीला विनंती केली की त्यांनी एकतर त्याला दुसऱ्या संघात ट्रेड करावं किंवा मग संघातून ऑक्शनपूर्वी रिलीज करावं. संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघ सोडू इच्छितो ही बातमी समोर आल्यावर 5 वेळा आयपीएल विजेता राहिलेला चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने सॅमसनला आपल्या संघात घेण्यासाठी स्वारस्य दाखवल आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार IPL 2025 नंतर संजू सॅमसनने चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगची सुद्धा भेट घेतली.
Prakash (definitelynot05) August 8, 2025
Exclusive: Sources confirm that Ashwin has requested CSK to release him ahead of IPL 2026
Source : CricJohns pic.twitter.com/FP8dFTN5bK
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, '30 वर्षीय संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स उत्सुक आहे. ते संजूला ट्रेड करून किंवा कॅशच्या माध्यमातून आपल्या संघात घेतील. पण राजस्थान रॉयल्स संघ हा संजूच्या बदल्यात चेन्नई सुपरकिंग्सकडून दोन खेळाडूंची देवाणघेवाण करण्यास प्राधान्य देऊ शकतो'.
CSK संजू सॅमसनला का घेऊ इच्छित आहे?
संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सचा यशस्वी कर्णधार आणि स्टार विकेटकिपर-फलंदाज आहे. त्याच्या नेतृत्व आणि फलंदाजीच्या कौशल्यामुळे CSK त्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी उत्सुक आहे. त्याने CSK चे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
रविचंद्रन अश्विनची आयपीएल 2025 मधील कामगिरी कशी होती?
आयपीएल 2025 मध्ये अश्विनने CSK साठी 9 सामन्यांमध्ये केवळ 7 विकेट घेतल्या. त्याला मेगा ऑक्शनमध्ये CSK ने 9.75 कोटींना करारबद्ध केले होते.
अश्विनच्या CSK सोडण्यामागील कारण काय असू शकते?
मीडिया रिपोर्ट्समध्ये अश्विनच्या CSK सोडण्यामागील कारण स्पष्टपणे नमूद केलेले नाही. मात्र, त्याने फ्रेंचायझीशी संपर्क साधून आपला निर्णय कळवला आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.