T20 Cricket Double Century: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकही फलंदाज द्विशतक ठोकू शकलेला नाही. क्रिस गेल-एबी डिव्हिलिअर्स यांच्यासारखे स्फोटक फलंदाजही ही कामगिरी करु शकलेला नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही फलंदाज दुहेरी शतक ठोकण्यात यशस्वी झाला नसला तरी, टी-20 लीगमध्ये मात्र एका फलंदाजाने 2022 मध्ये ही कामगिरी केलेली आहे. या फलंदाजाने तुफान फलंदाजी करत चौकार आणि षटकार लगावले होते. या फलंदाजाने 77 चेंडूंमध्ये नाबाद 205 धावा ठोकल्या होत्या.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवालने 2002 मध्ये टी-20 मध्ये डबल सेंच्यूरी ठोकत क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. 32 वर्षीय या क्रिकेटरने अमेरिकेतील स्पर्धा अटलांटा ओपन लीगमध्ये ही जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने तुफान फटकेबाजी करत गोलंदाजांच्या अक्षऱश: चिंधड्या उडवल्या होत्या. त्याच्या फलंदाजीची शैली अशी होती की, जणू काही गोलंदाज आता आम्हाला सोडून द्या अशी भीक मागत होते. रहकीम कॉर्नवालने 77 चेंडूंचा सामना करताना 205 धावांची अविश्वसनीय खेळी केली. टी-20 क्रिकेटमध्ये आजही याकडे एक महान खेळी म्हणून पाहिलं जातं.
रहकीम कॉर्नवॉल अशा पद्धतीने फलंदाजी करत होता की प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकारांसाठी जात होता. गोलंदाजांवर कोणतीही दया माया न दाखवता तो चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत राहिला. त्याचा स्ट्राईक रेट 266 होता. त्याने त्याच्या वादळी खेळीत 22 उत्तुंग षटकार आणि 17 चौकार मारले. मायनर लीग क्रिकेटनेच रहकीम कॉर्नवॉलच्या या वेगवान फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. रहकीम कॉर्नवॉल किती निर्भयपणे फलंदाजी करत होता हे व्हिडीओत दिसत आहे.
ARE YOU NOT ENTERTAINED?!
— Minor League Cricket (@MiLCricket) October 6, 2022
Rahkeem Cornwall put Atlanta Fire on top with a DOUBLE century going 205*(77) with MASSIVE sixes pic.twitter.com/1iRfyniiUw
रहकीम कॉर्नवॉलच्या चौकार आणि षटकारांच्या धावा मोजल्या, तर त्याने फक्त त्यांच्याच सहाय्याने द्विशतक पूर्ण केलं. या खेळीसह तो टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा महान पराक्रम करणाऱ्या काही निवडक फलंदाजांमध्ये सामील झाला. त्याच्या आधी, 2021 मध्ये, सुबोध भारती नावाच्या फलंदाजाने टी-20 सामन्यात 79 चेंडूंचा सामना करत 205 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच वेळी, सागर कुलकर्णी हा टी-20 मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज मानला जातो, ज्याने 2008 मध्ये अशीच कामगिरी केली होती. या फलंदाजाने फक्त 56 चेंडूत 219 धावा केल्या.