Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

RR vs DC, IPL 2023: गुवाहाटीच्या मैदानावर राजस्थान 'एकदम ओके'; 57 धावांनी केला दिल्लीचा कार्यक्रम

Rajasthan Royals beat Delhi Capitals: जयस्वालची (Yashasvi Jaiswal) यशस्वी खेळी आणि दुसरीकडे जॉस द बॉसचं (Jos Buttler) खणखणीत अर्धशतक याच्या जोरावर राजस्थानने (RR vs DC) विजय नोंदवला आहे.  

RR vs DC, IPL 2023: गुवाहाटीच्या मैदानावर राजस्थान 'एकदम ओके'; 57 धावांनी केला दिल्लीचा कार्यक्रम

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: गुवाहटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 'एकदम ओके' कार्यक्रम केला आहे. राजस्थानने दिलेल्या 200 धावांचा टप्पा पार करताना दिल्लीचा ... धावांनी पराभव झालाय. त्यामुळे आता राजस्थाने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. मागील सामन्यातील पराभव वगळला तर राजस्थानच्या रजवाड्यांनी विजयाचा रथ खेचून धरला आहे. दिल्लीविरूद्ध राजस्थानच्या संघाने एकीचं बळ दाखवून दिलं.

प्रथम टॉस जिंकून दिल्लीने (Delhi Capitals) गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी फलंदाजीसाठी खास असल्याने सामना टफ होणार याची शक्यता होती. राजस्थानच्या सलामीवीरांनी दिल्लीच्या तोंडचं पाणी पळवलं. जयस्वालची (Yashasvi Jaiswal) यशस्वी खेळी आणि दुसरीकडे जॉस द बॉसचं (Jos Buttler) खणखणीत अर्धशतक याच्या जोरावर राजस्थानने मजबूत आघाडी मिळवली. पहिल्या डावात बटलरने 79 धावा केल्या. यावेळी त्याने 11 चौकार तर 1 सिक्स देखील खेचला. तर जयस्वालने 31 चेंडूत 60 धावा केल्यात. तर अखेरच्या ओव्हरमध्ये हेटमायरने 39 धावांची वादळी खेळी केली.

आणखी वाचा - AB de Villiers: LIVE कार्यक्रमात डिव्हिलियर्सचं पत्नीसोबत भांडण; Danielle ला अचानक काय झालं? पाहा Video

राजस्थानने दिलेलं 200 धावांचं आव्हान दिल्लीला पेलता आलं नाही. दिल्लीने एम्पॅक्ट प्लेयर म्हणून पृथ्वी शॉला संधी दिली परंतू पृथ्वी डकवर बाद झाला. त्याला एकही धाव घेता आली नाही. तर दुसरीकडे वॉर्नरने आक्रमक खेळी करत दिल्लीला सावरण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी ललित यादवने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र, 38 धावा करत तो तंबुत परतला. या सामन्यात बोल्टने तीन विकेट घेत राजस्थानचा विजय निश्चित केला होता.

दरम्यान, यंदाच्या हंगामात दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव आहे. मागील दोन्ही सामन्यात दिल्लीचा पराभव झाला होता. त्यामुळे आता दिल्लीच्या चाहते नाराज असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे राजस्थाने यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ पॉईंटंस टेबलच्या अव्वल स्थानी विराजमान झालाय.

Read More