मुंबई: राजस्थान रॉयल्सची नुकतीच जर्सी लाँच करण्यात आली आहे. 9 एप्रिलपासून IPLचे सामने सुरू होत आहेत. 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना होणार आहे. त्यानंतर 15 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना रंगणार आहे.
यंदाच्या जर्सीसाठी EXPO2020 राजस्थान रॉयल्सचा स्पॉन्सर आहे. दरवर्षीपेक्षा RRची जर्सी यंदा थोडी वेगळी आहे. यंदाच्या राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये निळा आणि गुलाबी रंग आहे. या दोन्ही रंगांचं कॉम्बिनेशन असलेली ही जर्सी संघातील खेळाडू घालणार आहेत.
Starring Rajasthani block prints. Forged for a cause.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 5, 2021
The new Royals matchday kit, more than just a jersey. #HallaBol | #RoyalsFamily | #IPL2021 pic.twitter.com/BFxebKxn0o
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 5, 2021
Royals 2021 Matchday Replica, available now: https://t.co/upeTCORHp1#HallaBol | #RoyalsFamily pic.twitter.com/BkVTKHTWp9
राजस्थान रॉयल्समध्ये कोणकोण
संजू सॅमसन (कर्णधार), आकाश सिंग, एन्ड्र्यू टाय, अनुज रावत, बेन स्टोक्स, चेतन साकारिया, ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, कार्तिक त्यागी, केसी करियप्पा, कुलदीप यादव, लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर , मनन वोहरा, मयंक मार्कंडेय, मुस्तफिजुर रहमान, राहुल तेवतिया, रायन पराग, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, यशस्वी जयस्वाल