Raj Kundra Controversy over Rajasthan Royals : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील राजस्थान रॉयल्स संघाचे माजी सहमालक राज कुंद्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजस्थान रॉयल्सचे विद्यमान मालक मनोज बडाले यांनी ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप करत लंडनमधील हायकोर्टात राज कुंद्राविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
2009 मध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मॉरिशसस्थित एका कंपनीच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्समध्ये गुंतवणूक केली होती. त्यांनी जवळपास 15.4 मिलियन डॉलरला 11.7 टक्के हिस्सेदारी विकत घेतली होती. याच काळात राजस्थानने IPL चा पहिला विजेतेपद मिळवले. मात्र 2013 मध्ये सट्टेबाजीच्या आरोपांनंतर राज कुंद्रा अडचणीत आला आणि दिल्ली पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर BCCI ने त्यांच्यावर बंदी घातली आणि दोन वर्षांसाठी राजस्थान रॉयल्सवरही बंदी लावण्यात आली.
या घडामोडीनंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी IPL पासून पूर्णपणे बाजूला झाला. मात्र, त्यांनी खरेदी केलेल्या हिस्सेदारीवरून वाद मिटलेला नव्हता.
राजस्थान रॉयल्सचे सध्याचे प्रमुख भागीदार असलेल्या इमर्जिंग मीडिया व्हेंचर्स (ज्यांची संघात 65% हिस्सेदारी आहे) कंपनीने लंडनच्या हायकोर्टात राज कुंद्रावर गोपनीय कराराचे उल्लंघन केल्याचा दावा दाखल केला आहे. बडाले यांचे वकील अॅडम स्पेकर यांनी कोर्टात दावा केला की, कुंद्राने त्यांच्या क्लायंटला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, कुंद्रा यांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रारी करण्याची धमकी दिली होती, तसेच BCCI कडेही काही आरोप पोहोचवण्याचा इशारा दिला होता.
राज कुंद्राने या आरोपांचे खंडन केले असून, त्याने सांगितले की तो चर्चा करण्यास तयार आहे. त्याला मूळ हिस्सेदारी परत मिळावी किंवा राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या सध्याच्या बाजारमूल्यावर आधारित भरपाई मिळावी. तसंच, त्याने IPL चे माजी कमिशनर ललित मोदी यांना एक संदेशही पाठवला होता, ज्यात त्यांने म्हटलं की, "बडाले यांनी मला फसवले, आणि त्याची किंमत त्यांना आता समजेल."
I will soon be releasing documented evidence exposing serious financial misconduct,through offshore structures and hidden transactions involving a key promoter of the Rajasthan Royals. This includes deceit and manipulation in many shareholder dealings! @BCCI pic.twitter.com/42f10bC50O
— Raj Kundra (@onlyrajkundra) May 28, 2025
सध्या लंडनच्या हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू असून, पुढील निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.