Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

घरच्या मैदानावर तिसऱ्या पराभवाचे पाटीदारने कोणावर खापर फोडले? दिले विचित्र 'कारण', जाणून घ्या काय म्हणाला RCB चा कर्णधार

Rajat Patidar Statement After losing Match: पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने पराभवाचे कारण सांगितले आहे. आरसीबीचा कर्णधार काय म्हणाला ते जाणून घेऊयात.   

घरच्या मैदानावर तिसऱ्या पराभवाचे पाटीदारने कोणावर खापर फोडले? दिले विचित्र 'कारण', जाणून घ्या काय म्हणाला RCB चा कर्णधार

RCB vs PBKS , IPL 2025: आयपीएल 2025 चा सीजन आता अजूनही रंगदारपणे सुरु आहे. अनेक सामने रंजक होत आहेत. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना शुक्रवारी झाला. यात पंजाब किंग्जविरुद्ध 5 विकेट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पराभव झाला. पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार निराश झालेला दिसला. शुक्रवारी झालेल्या 34 व्या सामन्यात आरसीबीची फलंदाजी खूपच खराब होती. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी बाद फक्त 95 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, पंजाबने 12.1 षटकांत 98 धावा करून सामना जिंकला. आता या पराभवाचे रजत पाटीदारने कोणावर खापर फोडले आहे हे जाणून घेऊयात. 

काय म्हणाला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार?

पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला, " आम्ही फलंदाजी युनिट म्हणून खराब कामगिरी केली. याशिवाय खेळपट्टी देखील खूपच कठीण होती. आमच्यासाठी पार्टनरशिप करणे महत्त्वाचे होते, पण ते घडले नाही. आम्ही लवकर विकेट गमावल्या, जे आमच्यासाठी आगामी सामन्यांसाठी एक धडा आहे. परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही पडिक्कलच्या रूपात संघात बदल केला, पण तो प्रभावी ठरला नाही." याशिवाय  तो म्हणाला की,  "आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि विजयी धावसंख्या नोंदवावी लागेल. फलंदाजीतील आमच्या काही चुका आम्ही सुधारू शकतो."  

हे ही वाचा: लिंग बदल करून आर्यनची झाली अनाया..., पण पीरियड्स येतात का? संजय बांगरच्या लेकीने स्वतःच दिले उत्तर 

 

पंजाबविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार रजत पाटीदार आणि टिम टिवेड वगळता इतर कोणताही खेळाडू फलंदाजी करताना क्रीजवर टिकू शकला नाही. टिम डेव्हिडने 26 चेंडूत 50 धावा केल्या, तर पाटीदारने 24 धावांचे योगदान दिले.

हे ही वाचा: अश्लील फोटो, शारीरिक संबंध... संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप!

रजत पाटीदारने केले गोलंदाजांचे कौतुक 

पंजाबविरुद्धच्या गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक रजत पाटीदारने केले. कौतुक करताना कर्णधार म्हणाला "आमच्या गोलंदाजी युनिटने सामन्यात खूप चांगले खेळले. या सामन्यात आमच्यासाठी ही सर्वोत्तम गोष्ट होती. विकेटही एवढीही वाईट नव्हत्या." 

Read More