Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अनुष्कासोबत स्टेडियममध्ये सेलिब्रेशन करणारी ही लकी गर्ल कोण?

अनुष्का शर्मासोबत मॅचचा आनंद घेणारी ही लकी गर्ल कोण? जी अवघ्या काही मिनिटांत झाली नॅशनल क्रश.... पाहा व्हिडीओ   

अनुष्कासोबत स्टेडियममध्ये सेलिब्रेशन करणारी ही लकी गर्ल कोण?

मुंबई : एका रात्रीमध्ये प्रसिद्धी मिळाली तर ती कोणाल आवडणार नाही? आपल्या आवडत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यासोबत किंवा व्यक्तीसोबत एक संध्याकाळ घालवायला मिळणं लकी समजलं जातं. एका तरुणीला ही संधी मिळाली आणि रातोरात तिला प्रसिद्धी मिळाली. 

या तरुणीला बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मॅच पाहण्याची संधी मिळाली. बंगळुरू विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात ही तरुणी मॅच पाहायला आली होती. तिला अगदी जवळून अनुष्का शर्माला पाहता आलं. एवढंच नाही तर अनुष्कासोबत तिने सेल्फी देखील घेतला आहे. 

या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या तरुणीचं नाव रवीना आहुजा असल्याची माहिती मिळाली आहे. तिने मॅचदरम्यानचा आपला अनुभव शेअर केला.

तिचा व्हिडीओ 10 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमुळे तिचे फॉलोअर्स देखील वाढले आहेत. रवीनाला त्या एका व्हिडीओनं एका रात्रीत खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. 

रवीनाचे फॉलोअर्स हजारोंच्या घरात पोहोचले आहेत. रवीनाला सोशल मीडियावर रातोरात खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. तिची चर्चा सगळीकडे होत आहे. अवघ्या काही मिनिटांत ती नॅशनल क्रशही झाली. 

Read More