Bengluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल 2025 चं (IPL 2025) विजेतेपद पटकावल्यावर बंगळुरूमध्ये विजयोत्सव साजरा करताना ही चेंगराचेंगरीची घटना घडली होती. ज्यात तब्बल 11 लोकांनी जीव गमावला. या प्रकरणाच्या चौकशीनंतर एम चिन्नस्वामी स्टेडियमला असुरक्षित करार देण्यात आलेला आहे. ज्यामुळे आरसीबी (RCB) संघाकडून आयपीएलच्या आगामी सामन्याचे यजमानपद काढून घेतले जाऊ शकते. ज्यामुळे आरसीबीला त्यांचं होम ग्राउंड असलेल्या चिन्नस्वामी स्टेडियमवर सामने खेळता येणार नाहीत.
4 जून रोजी चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीचं प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जस्टिस जॉन माइकल कुन्हा कमीशन समिती गठीत केली. क्रिकइंफोच्या माहितीनुसार एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी असुरक्षित घोषित करण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये आढळले की स्टेडियमच्या परिसरात 100 पोलीस कर्मचारी तैनात होते. स्टेडियमच्या बाहेर जेव्हा विजयी परेड दरम्यान आरसीबीच्या फॅन्सची गर्दी जमली तेव्हा तेथे पर्याप्त सुरक्षारक्षक उपस्थित नव्हते. शिवाय आयोजन स्थळावर कोणतीही रुग्णवाहिका सुद्धा नव्हती. कर्नाटक सरकारने आरसीबी विरुद्ध या महिन्याच्या सुरुवातीलाच खटला नोंदवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आरसीबी अडचणीत येणं हे निश्चित आहे.
हेही वाचा : पंतच्या तुटलेल्या पायावर अटॅक करणाऱ्या बेन स्टोक्सला सिराजने दाखवला इंगा, बॉल अशा ठिकाणी मारला की...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा सुरुवातीपासून आयपीएलचा भाग राहिला आहे. पण गेल्या १७ वर्षांमध्ये त्यांना एकदाही आयपीएलचं विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. मात्र 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनल सामन्यात पंजाब किंग्सवर आरसीबीने विजय मिळवला. कर्णधार रजत पाटीदार यांच्या नेतृत्वात आरसीबीने ही ट्रॉफी जिंकली. त्यानंतर याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आरसीबीने चिन्नस्वामी स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी स्टेडियममध्ये जाण्यासाठी फॅन्सची मोठी गर्दी उसळली आणि यात अनेक जण जखमी झाले तर 11 जणांना यात त्यांचा जीव गमवावा लागला. जेव्हा या घटनेचा तपास सुरु झाला तेव्हा समोर आलं की बंगळुरू पोलिसांनी आरसीबीला विजयी मिरवणूक काढण्याची परवानगी दिलेली नव्हती.